April 23, 2025 8:14 PM April 23, 2025 8:14 PM

views 7

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत आणि कौस्तुभ गणवते ...

April 23, 2025 8:12 PM April 23, 2025 8:12 PM

views 7

पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल- संरक्षण मंत्री

पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं आयोजित हवाई दल मार्शल अर्जन सिंह स्मृती व्याख्यान कार्यक्रमात व्याख्यान दिलं.   त्यावेळी ते बोलत होते. दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता हेच भारताचं धोरण आहे, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना प्रत्युत्तर देताना सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, असं ते म्हणाले. यावेळी राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याचा निषेध करत पिडित कुटुंबांप्रति सहवेदनाही व्...

April 23, 2025 8:11 PM April 23, 2025 8:11 PM

views 7

पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी तीव्र निषेध नोंदवला असून, भारताला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक प्रमुख नेत्यांनी दूरध्वनीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या, तसंच दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारतासोबत असल्याची ग्वाही दिली.   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीन रामगुलाम आणि नेपाळचे प्रधानमंत्री के.पी. शर्मा ओली यांनी दूरध्वनीद्वारे प्रधानमंत्र्यांशी चर्चा करून हल्ल्याचा निषेध केला आणि मृतांबद्दल...

April 23, 2025 7:36 PM April 23, 2025 7:36 PM

views 7

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी विशेष गाडी आज रात्री सोडणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे कटरा ते दिल्ली विशेष गाडी आज रात्री सोडणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेने विशेष हेल्पलाईन क्रमांक जम्मू - तावी, श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि उधमपूर या स्थानकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.    श्रीनगर हून दिल्ली आणि मुंबई करता मिळून ४ विशेष विमानं सोडण्यात आली, आणि प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी विमानसेवा उपलब्ध करुन दिल्या जातील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं आहे. 

April 23, 2025 7:29 PM April 23, 2025 7:29 PM

views 13

पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सार्वत्रिक निषेध

जम्मू काश्मीरमधे पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा राज्यात सर्वत्र निषेध होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून काश्मीरमधे अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी  शासन सज्ज असल्याचं म्हटलं आहे. राज्यातल्या विविध राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.    मुंबईत शहर भाजपनं कांदिवली इथं  भारतीय जनता पक्षानं दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. या ...

April 23, 2025 6:59 PM April 23, 2025 6:59 PM

views 18

दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ लडाखमधे अर्ध्या दिवसाचा बंद

पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून लडाख इथे अर्ध्या दिवसाचा बंद पाळण्यात आला. कारगिल शहर आणि परिसरातली सर्वं दुकानं बंद होती. या हल्ल्याबद्दल स्थानिकांमधून दुःख व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. लडाखमधल्या अनेक नेते आणि संघटनांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

April 23, 2025 3:48 PM April 23, 2025 3:48 PM

views 14

पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह राज्यात परत आणण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.    डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने, पुण्याचे कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे तसंच नवी मुंबईचे द...

April 23, 2025 3:46 PM April 23, 2025 3:46 PM

views 11

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलं सतर्क, हल्लेखोरांचा शोध जारी

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे. हा मदत कक्ष चोवीस तास सुरू राहणार असून पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ०२२-२२०२७९९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन राज्य शासनाने केलं आहे.    श्रीनगर जिल्हा प्रशासनानेही पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता यावा यासाठी मदत कक्ष स्थापन केला असून ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४६३६५१, ०१९४-२४५७५४३ या क्रमाकांवर संप...

April 23, 2025 1:48 PM April 23, 2025 1:48 PM

views 13

हलगाम हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर १६ जण जखमी

काश्मीरमधे पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वत्र तीव्र निषेधाची लाट उमटली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २७ जणांचा बळी गेला असून त्यातले बहुसंख्य पर्यटक होते. महाराष्ट्रातल्या ६ पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि गंभीर रीत्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातले आणखी किती पर्यटक तिथं होते याचा शोध राज्यसरकार घेत आहे. पहलगाम ...

April 23, 2025 1:01 PM April 23, 2025 1:01 PM

views 10

Pahalgam Terror Attack : केंद्रीय गृहमंत्र्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना पुष्पांजली वाहिली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नायब राज्यपाल मनोज सिन्हा , जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज श्रीनगरमध्ये पोलीस नियंत्रण कक्षात पहलगाम दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना पुष्पांजंली अर्पण केली. यावेळी अमित शहा यांनी मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं. मृतांचं पार्थिव विशेष विमानानं श्रीनगरहून त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवलं जात आहे.   यानंतर गृहमंत्री पहलगामजवळ बैसरन इथं प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. ते हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी करणा...