July 11, 2025 3:40 PM July 11, 2025 3:40 PM

views 34

सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना प्रधानमंत्री नियुक्ती पत्रांचं वितरण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. हा १६वां रोजगार मेळा देशभरात ४७ ठिकाणी आयोजित केला जाणार असून प्रधानमंत्री यात संबोधन करणार आहेत.   नवीन भरती केलेले युवक रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य-कुटुंब कल्याण, कामगार-रोजगार, पोस्ट यासह अन्य विभागांमध्ये सामील होतील. देशभरात रोजगार मेळ्यांद्वारे आजवर १० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रं जारी करण्यात आली आहेत.

July 6, 2025 8:21 PM July 6, 2025 8:21 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रिओ दी जानेरोमधे दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री आज ब्राझीलला पोहोचले. तिथल्या भारतीय समुदायानं उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो इथल्या म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट इथं पोचले, तेव्हा ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनॅशिओ लुला दा सिल्वा यांनी त्यांचं स्वागत केलं. ब्रिक्स शिखर परिषदेत जागतिक शासन सुधारणा, हवामान बदलाची आव्हानं, कृत्रिम बुद्धिमत्तेसह इतर अनेक विषयांवर विचारमंथन होणार आहे.

July 5, 2025 8:18 PM July 5, 2025 8:18 PM

views 20

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिना दौऱ्यावर, अर्जेंटिनाच्या अध्यक्षांसोबत विविध सामंजस्य करारांची शक्यता

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्युनोस आयर्स इथं अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हॅविअर मिले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यात व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि औषधनिर्माण, संरक्षण आणि सुरक्षा, खाणकाम आणि खनिज संपत्ती यासारख्या मुद्द्यांवर सहकार्य कराराची अपेक्षा आहे. अर्जेंटिनाच्या भेटीनंतर, ते रिओ दि जानेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझील इथं रवाना होतील. त्यानंतर आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते नामिबिया इथं भेट देतील.  

July 4, 2025 9:54 AM July 4, 2025 9:54 AM

views 13

पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये शानदार स्वागत

भारत हा जगभरातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. तत्पुर्वी विमानतळावर त्यांचे शानदार स्वागत करण्यात आलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा असून आपले पुर्वज भारतीय संस्कृतीचे वाहक आहेत असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा आहे आणि 1999 नंतरचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. आपल्या ...

July 3, 2025 1:25 PM July 3, 2025 1:25 PM

views 44

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना इथल्या संसदेत भाषण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी घाना इथल्या संसदेत भाषण करणार असून अक्रा इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.   अक्रा इथल्या एनक्रुमा स्मारकालाही ते भेट देणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, शेती, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याविषयी सहमती ...

July 1, 2025 8:38 PM July 1, 2025 8:38 PM

views 6

डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशानं नव्या युगात प्रवेश केल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

 डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं, या उद्देशानं २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केलं होतं. यासंदर्भात समाजमाध्यमावर जारी केलेल्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पामुळे देशानं डिजिटल पेमेंट्स मध्ये मोठी झेप घेतल्याचं नमूद केलं.   शहरी भागापासून ते गलवान, सियाचीन आणि लडाखसारख्या दुर्गम लष्करी भा...

June 11, 2025 4:02 PM June 11, 2025 4:02 PM

views 10

गेल्या ११ वर्षात नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा – प्रधानमंत्री

अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारताने घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्याने प्रेरित आहे, असं प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  पायाभूत सुविधांमधल्या क्रांतीची अकरा वर्षे असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात नमूद केलं आहे. रेल्वे , महामार्ग  , बंदरे, विमानतळ याबरोबरच इतर पायाभूत सुविधांमुळे राहणीमानातील सुविधा आणि समृद्धीत वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  या वैशिष्ट्यांमुळे आत्मनिर्भर भारताचा पाया घालता गेल्यांचं या संदेशात नमूद केलं आहे.

June 7, 2025 8:08 PM June 7, 2025 8:08 PM

views 20

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.    गेल्या ११ वर्षांत, विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून, कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं. तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगामी काळातही शेतकऱ्यां...

May 12, 2025 2:55 PM May 12, 2025 2:55 PM

views 11

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.    दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्यदलाच्या डीजीएमओ मधलं आज दुपारी १२ वाजता नियोजित असलेलं संभाषण आज संध्याकाळी होणार असल्याचं वृत्त आहे.

May 8, 2025 1:42 PM May 8, 2025 1:42 PM

views 11

डोवाल यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काल डोवाल यांनी जगभरातल्या नेत्यांशी संपर्क साधला  आणि पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.