अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारताने घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्याने प्रेरित आहे, असं प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पायाभूत सुविधांमधल्या क्रांतीची अकरा वर्षे असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात नमूद केलं आहे. रेल्वे , महामार्ग , बंदरे, विमानतळ याबरोबरच इतर पायाभूत सुविधांमुळे राहणीमानातील सुविधा आणि समृद्धीत वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या वैशिष्ट्यांमुळे आत्मनिर्भर भारताचा पाया घालता गेल्यांचं या संदेशात नमूद केलं आहे.
Site Admin | June 11, 2025 4:02 PM | narendra modi
गेल्या ११ वर्षात नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा – प्रधानमंत्री
