शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या ११ वर्षांत, विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून, कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं. तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगामी काळातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारचे प्रयत्न सुरु राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं.