June 22, 2025 7:08 PM June 22, 2025 7:08 PM
12
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भरवलेल्या जनता दरबारात ९२ प्रकरणांचा निपटारा
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भरवलेल्या जनता दरबारात आज ९२ प्रकरणांचा निपटारा झाला. मुंबईतल्या कांदिवली इथल्या गोयल यांच्या कार्यालयात झालेल्या या उपक्रमात अनेक नागरिकांनी आपले तक्रार अर्ज आणि निवेदनं सादर केली. त्याचप्रमाणे अनेक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या मागण्या आणि तक्रारी सादर केल्या. यापैकी अनेक प्रकरणात तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश गोयल यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले.