डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईत बेस्ट बसच्या प्रवासभाड्यात वाढ !

मुंबईत बेस्ट उपक्रमावरचं आर्थिक संकट दूर करण्यासाठी बेस्ट बसच्या किमान प्रवासभाड्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. साध्या बसकरता पहिल्या पाच किलोमीटरसाठी १० रुपये, तर वातानुकूलित बसकरता पहिल्या पाच किलोमीटरसाठी १२ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहे. १० किलोमीटरसाठी १० ऐवजी १५ रुपये, १५ किलोमीटरसाठी १५ ऐवजी २० रुपये, २० किलोमीटरसाठी २० ऐवजी ३०, २५ किलोमीटरसाठी २० ऐवजी ३५, तर पुढं प्रत्येक ५ किलोमीटरसाठी ५ रुपये वाठीव प्वासभाडं द्यावं लागणार आहे. 

 

मासिक पास ९०० रुपयाऐवजी १ हजार ८०० रुपये, तर दैनंदिन पाससाठी ६० रुपयाऐवजी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. ५ ते १२ वर्षाच्या मुलांना अर्धं तिकीट असेल. ज्येष्ठ नागरीकांसाठी बस पासमध्ये ५० रुपये सवलत दिली जाईल. दिव्यांग प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची सुविधा कायम ठेवली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा