January 1, 2026 3:33 PM
232
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २ हजार ३४९ उमेदवारी अर्ज वैध
महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले १६७ अर्ज अवैध ठरले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९४६ अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या छाननीनंतर ११७ अर्ज अवैध ठरले तर ८३९ अर्ज वैध ठरले. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एकूण १ हजार ४६० अर्ज दाखल झाले होते. छाननीत या अर्जांपैकी २३० अर्ज अवैध ठरले असून १...