November 9, 2025 7:09 PM November 9, 2025 7:09 PM
17
मुंबई विद्यापीठात “पॉलिमर केमिस्ट्री रिसर्च लॅबोरेटरी” या संशोधन प्रयोगशाळेचं नूतनीकरण
मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात “पॉलिमर केमिस्ट्री रिसर्च लॅबोरेटरी” या संशोधन प्रयोगशाळेचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. युरोफिन्स या कंपनीच्या उद्योग सामाजिक दायित्व निधीतून, या प्रयोगशाळेत अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमुळे पॉलिमर, बॅटरी सामुग्री आणि अनुप्रयुक्त विज्ञान क्षेत्रातल्या संशोधनाला नवचैतन्य मिळणार आहे.