विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ६ तारखेला मुंबई विद्यापीठात ‘विकास २०२५’ या अखिल भारतीय विभागवार एक दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये अधिक सशक्त समन्वय साधणं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंत्री, शिक्षण तज्ज्ञ या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. या पश्चिम विभागीय ‘विकास २०२५’ परिषदेत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात इथून सुमारे ५०० मान्यवर सहभागी होणार आहेत.