May 5, 2025 7:11 PM May 5, 2025 7:11 PM
14
अहिल्यानगरमधल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचं औचित्य साधून ही बैठक चौंडी इथं आयोजित केल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. या बैठकीत जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निर्णय होतील असंही ते म्हणाले. भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीचं भूमीपूजन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसंच अहिल्यानगर शहरातल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमं...