May 13, 2025 3:09 PM May 13, 2025 3:09 PM

views 6

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र ८९ पदकांसह पदकतालिकेत अव्वल

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ८९ पदकांसह पदकतालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेचा आजचा दहावा दिवस असून आज झालेल्या जिमनॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या परिना हिने सुवर्णपदक जिंकलं आहे. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या देवांगी पवार हिने कांस्य पदकाची कमाई केली आहे. बॉल जिमनॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या किमया कारळे हिने सुवर्ण पदक ...

May 12, 2025 8:36 PM May 12, 2025 8:36 PM

views 8

Khelo India : महाराष्ट्र ८४ पदकांसह पदकतालिकेत अग्रस्थानी

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ८४ पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं पदकतालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३३ सुवर्ण आणि २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक ४४ पदकांसह दुसऱ्या तर राजस्थान २७ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.    खेलो इंडियाचा आज नववा दिवस असून आज दिवसभरात मुष्टियुद्ध, टेनिस आदी खेळांचे सामने झाले. तसंच नव्याने समाविष्ट झालेले कलारीपायत्तू आणि थांग खेळही खेळले गेले.    फूटबॉलम...

May 11, 2025 8:29 PM May 11, 2025 8:29 PM

views 7

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रची ७५ पदकांची कमाई

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत ७५ पदकांची कमाई केली आहे. यात २८ सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कास्य पदकांचा समावेश आहे. त्यातही सर्वाधिक २९ पदकं पोहण्याच्या स्पर्धेत मिळाली असून त्यात ७ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. त्याखालोखाल तिरंदाजी, नेमबाजी, सायकलिंक, भारोत्तोलन, मल्लखांब, टेबलटेनिस आणि खो-खो या खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्राखालोखाल १४ सुवर्ण पदकांसह ३९ पदकं मिळवून कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान २३ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.   खेलो इंडिया स्...

May 11, 2025 5:05 PM May 11, 2025 5:05 PM

views 7

Khelo India : महाराष्ट्राच्या खेळाडूंची ७४ पदकांची कमाई

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत ७४ पदकांची कमाई केली आहे.अदिती हेगडेनं आतापर्यंत सहा पदकं मिळवली आहेत. कराडची अस्मिता ढोणे हिनं एकंदर १७० किलो वजन उचलून ४९ किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं.आकांक्षा व्‍यवहारेनं भारोत्तोलन प्रकारात ४५ किलो गटात सुवर्ण पदक मिळवलं तर टेबल टेनिस मध्ये काव्या भटनं  सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.   २७  सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कास्य पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. १४ सुवर्ण पदकांसह ३९ पदक मिळव...

May 9, 2025 7:35 PM May 9, 2025 7:35 PM

views 18

Khelo India Youth Games : 55 पदकं पटकावत महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानी

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं कालच पदकांचं अर्धशतक पूर्ण केलं, आणि आतापर्यंत २३ सुवर्ण, १९ रौप्‍य आणि १६ कांस्य अशी एकंदर ५८ पदकं पटकावत पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखलं आहे. (कर्नाटक ३१ पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर, तर पंजाब आणि हरियाणा प्रत्येकी २२ पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहेत.)    नेमबाजी स्पर्धेत, महाराष्ट्राच्या पार्थ  माने आणि शांभवी क्षीरसागर यांनी १० मीटर एअर रायफल युवा गटाच्या मिश्र संघामध्ये सुवर्णपदक पटकावलं. या नेमबाजी स्पर्धेत शांभवीचं  दुसरं  सुवर्णपदक आ...

May 6, 2025 2:58 PM May 6, 2025 2:58 PM

views 2

Khelo India : जलतरण स्पर्धेत महाराष्ट्रच्या आदिती हेगडेला सुवर्णपदक

बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात आदिती हेगडे हिने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक सुवर्ण एक रौप्य आणि पाच कास्य अशी ७ पदकं मिळवली. तिरंदाजीत महाराष्ट्राचे सात खेळाडू पदकासाठी लढणार आहेत. मल्लखांबमध्येही सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घेतली आहे. खो-खोमध्ये पंजाबचा ५८ विरुद्ध ९ असा पराभव करत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली. या स्पर्धेत कर्नाटक चार सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह पदकतालि...

May 5, 2025 8:11 PM May 5, 2025 8:11 PM

views 8

Khelo India Youth Games : तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्णपदकाकडे वाटचाल

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तिरंदाजी प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. महिला गटात वैष्णवी पवार  आणि शर्वरी शिंदे यांच्यात सुवर्ण पदकासाठी सामना होणार आहे. तर पुरुष गटात महाराष्ट्राचा उज्ज्वल ओळेकर आणि तामिळनाडूचा एल आर सर्वेश यांच्यात सामना होणार आहे.    कम्पाऊंड स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राचा मानव गणेश जाधव आणि झारखंडचा देवांश सिंह यांच्यात सुवर्ण पदकासाठी लढत होईल. तर महिला गटात महाराष्ट्राच्यात तेजल साळवे आणि प्रथिका या सुवर्णपदाकाच्या दावेदार आह...