बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात आदिती हेगडे हिने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक सुवर्ण एक रौप्य आणि पाच कास्य अशी ७ पदकं मिळवली. तिरंदाजीत महाराष्ट्राचे सात खेळाडू पदकासाठी लढणार आहेत. मल्लखांबमध्येही सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घेतली आहे. खो-खोमध्ये पंजाबचा ५८ विरुद्ध ९ असा पराभव करत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली. या स्पर्धेत कर्नाटक चार सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह पदकतालिकेत पहिल्या, दिल्ली दोन सुवर्णपदकांसह दुसऱ्या आणि राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे.
Site Admin | May 6, 2025 2:58 PM | Khelo India Youth Games
Khelo India : जलतरण स्पर्धेत महाराष्ट्रच्या आदिती हेगडेला सुवर्णपदक
