February 2, 2025 8:12 PM February 2, 2025 8:12 PM
16
आदिवासीबहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन
आदिवासीबहुल भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागसलेपण दूर करणं सर्वांत मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर मध्ये एम्स इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित फिस्ट २०२५ या परिषदेच्या उद्घाटनावेळी गडकरी आज बोलत होते. सेवा आणि उत्पादन क्षेत्राचं जीडीपीमधलं योगदान वाढवण्यासाठी सरकारनं दुर्गम भागांना प्राधान्य दिलं आहे, आदिवासीबहुल भागाच्या सर्वसमा...