January 18, 2026 8:01 PM

views 55

भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचं निधन

माजी मंत्री  आणि वरिष्ठ भाजपा नेते राज पुरोहित यांचं आज मुंबईत   प्रकृती अस्वास्थ्यामुळे  निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते.  पुरोहित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवकपदापासून केली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी २५ वर्षं आमदार म्हणून काम केलं. ते मुंबईतील मुंबादेवी आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आले होते. तसंच १९९५ ते १९९९ दरम्यान, युती सरकारमध्ये त्यांनी  कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदार...

January 18, 2026 7:18 PM

views 55

जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस दावोसला रवाना

स्वित्झर्लंडमध्ये उद्यापासून सुरु होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज दावोस इथं पोहोचले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रशासनातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या पथकात समावेश आहे. या परिषदेत, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि झारखंडचे मुख्यमंत्री जागतिक उद्योग गट, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करतील आणि आपल्या राज्यात थेट परकीय गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर भर...

January 8, 2026 3:45 PM

views 18

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरा बदलण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. तसंच, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणाही त्यांनी केली.   एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो सेवेचा समावेश असेल. तसंच शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ई-बस सुविधा सुरू करण्यात येईल, अशी आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

December 19, 2025 8:13 PM

views 19

भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे- मुख्यमंत्री

भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे. भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेल्या विचारातून हे शक्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते.    आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असून नव्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक कच्चा माल तिथं उपलब्ध आहे. आफ्रिकेत उत्पादन सुरू झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल आणि त्याचं नेतृत्व भारत करेल. त्यासाठी उद्योजकांनी आफ्रिकेकडे लक्ष केंद्रित करण...

December 15, 2025 1:16 PM

views 26

इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा, असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

December 14, 2025 8:06 PM

views 50

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं. या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या ७ बैठकांमध्ये एकंदर ७२ तास ३५ मिनिटं काम झाल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. तर विधानपरिषदेच्या ७ बैठकांमध्ये ४८ तास १६ मिनिटं कामकाज झालं, असं विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. या कालावधीत विधानसभेत एकंदर १८ विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली आणि त्यातली १६ मंजूर झाली, तर विधानपरिषदेत ४ विधेयकं संमत झाली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६पासून मुंबईत होणार आ...

December 12, 2025 7:56 PM

views 45

सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या MahaCrimeOS AI’ ची मुंबईत सुरुवात

सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं MahaCrimeOS AI’ ची आज मुंबईत सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारच्या मार्व्हल या कंपनीच्या सहकार्यानं हा AI प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सध्या नागपुरातल्या २३ पोलिस ठाण्यात याचा वापर सुरू आहे. लवकरच राज्यातल्या सर्व अकराशे पोलिस ठाण्यात याचा वापर सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला यावेळी उपस्थित होते. मायक्रोसॉफ्टने भारतातल्या त्यांच्या १७ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राध...

December 12, 2025 8:19 PM

views 14

पुढच्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचं केंद्रसरकारचं उद्दिष्ट

पुढच्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचं केंद्रसरकारचं उद्दिष्ट असून, या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये विधान भवनात झालेल्या बैठकीत बोलत होते.   नक्षलवादाचं उच्चाटन करण्यासाठी राज्यातल्या अती दुर्गम भागात पोलीस चौक्या स्थापन करून या ठिकाणी पुरेसं मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. तसंच नक्षलवाद मुक्त भागातल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कल्याणकारी कार्यक्रम आयोजित करावेत...

December 5, 2025 7:34 PM

views 38

शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कंपनी स्थापन करणार

राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत एक वेगळी वीजकंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेअंतर्गत एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरकृषीपंप लावण्याच्या, राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं स्वीकारलं, या कार्यक्रमात ते बोलत होते.    गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र ...

November 18, 2025 7:38 PM

views 22

बिबट्याच्या वाढत्या हल्याच्या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राज्यात बिबट्यांकडून माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. माणसांवर बिबट्याचे हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री  फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर सुरु करणे,पोलिस आणि वनविभागाची गस्त तसंच रेस्क्यू टीम आणि वाहनांची संख्या वाढवणे, बिबट्यांना पकडण्यासाठी ड्रोनचा वापर, नरभक्षक...