March 29, 2025 7:49 PM

views 34

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढीपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्णन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आज केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पंढरपूर कॉरिडॉरचं काम सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

March 24, 2025 7:42 PM

views 21

कुणाल कामरा अडचणीत ! कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिलं. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा गोष्टी सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.    शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली. त्याने राज्यातले वातावरण दूषित केले आणि यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं खोतकर म्हणाले. ...

March 23, 2025 7:12 PM

views 20

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार-मुख्यमंत्री

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट २०२९ मधेच साध्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त  केला. सीआयआय यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज नाशिकमधे झाला, यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत, त्या दृष्टीनं समृद्धी महामार्ग तयार झाला असून शक्तिपीठ महामार्गही तयार केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक म...

March 6, 2025 8:24 PM

views 26

येत्या ३ महिन्यात राज्याचं अंतराळ धोरण तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

येत्या ३ महिन्यात राज्य सरकार अंतराळ धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं. ठाणे जिल्ह्यात उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं आय़ोजित स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नेंस कॉन्क्लेव्ह मध्ये ते बोलत होते.      गेल्या काही वर्षांत, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लवकरच हे तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले. अंतराळ धोरणामुळे काही वर्षांची कामे काही दिवसांत केली जातात. त्यामुळे योग्य धोरणे आखली तर ...

March 2, 2025 8:17 PM

views 17

विरोधी पक्षांना बोलण्याची संधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून विरोधी पक्षांना बोलण्याची संधी दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. आपल्याकडे एखादी बातमी आली तरी दुसऱ्याबाजू सहित ती बातमी प्रकाशित करावी, असी विनंतीही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी माध्यमांना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत असून त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांविरोधात निश्चित कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी द...

February 24, 2025 8:51 PM

views 28

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आणखी ३ हजार रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेत राज्य शासनातर्फे ३ हजारांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत मिळणारे ६ हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो कृषी सन्मान योजनेचे ६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. त्यात आता राज्य शासनाकडून ३ हजार रुपयांची वाढ करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच १५ हजार रुपये जमा होतील. या योजनेच्या माध्यमातून छोटे शेतकरी तसंच शेतीउत्पादक गटा...

February 19, 2025 8:40 PM

views 30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना लवकरच युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले आहेत, त्यांना लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने पुण्यात आज जय शिवाजी जय भारत पदयात्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवरायांची जयंती फक्त भारतातच नाही तर २० देशांमध्ये साजरी केली जाते. त्यांचं प्रशासन, कल्याणकारी धोरणं, संरक्षण आणि नौदलाचं व्यवस्थापन, दूरदर्शी नेतृत्व हे अतुल...

February 13, 2025 8:26 PM

views 21

जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान-मुख्यमंत्री

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेलं जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान असून लोकसहभागातून झालेली कामं जलक्रांतीच्या दिशेनं पडलेलं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जलसंधारण विभागाअंतर्गत ६०१ नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं ऑनलाईन पध्दतीनं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. प्रातिनिधीक स्वरुपात ६ उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती पत्रांचं वितरण मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या समारंभात करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस...

February 9, 2025 7:52 PM

views 22

डायनामीक सायबर प्लॅटफॉर्ममुळे शेकडो कोटी रुपयांची बचत – मुख्यमंत्री

राज्यानं तयार केलेल्या डायनामीक सायबर प्लॅटफॉर्ममुळे अल्पावधीतच शेकडो कोटी रुपयांची बचत झाली असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूर इथं सायबर हॅक कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. या समर्पित व्यासपीठानं सायबर धोक्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली असून इतर राज्य या प्रणालीचं अनुकरण करायला उत्सुक असल्याचं ते म्हणाले. 

February 9, 2025 7:36 PM

views 21

आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

बाबा आमटे यांनी सुरु केलेल्या आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. वरोरा इथं आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं आहे. आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हेे साध्य करता येईल असं ते म्हणाले.  आनंदवनात पाचशेजणांसाठी निवासी रुग्णकेंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शासकीय अनुदानाच्या...