November 6, 2025 8:38 PM November 6, 2025 8:38 PM

views 24

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या संभाजीनगर दौऱ्यावर

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या संभाजीनगर जिल्हा आणि परिसरातल्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहे. कृषीमंत्र्यांचा हा एकदिवसीय दौरा असून ते यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधतील, पूरग्रस्त भागाचा तसंच कृषी आणि ग्रामीण विकास योजनांच्या अंलबजावणीचा आढावा घेतील, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. अरणपूर या गावासह घरकुल गृहनिर्माण प्रकल्पालाही ते भेट देणार आहेत. त्यासह पुरामुळे नुकसान झालेल्या विंधन विहिरी, पूल आणि रस्त्यांची ते पाहणी करणार...

October 27, 2025 7:27 PM October 27, 2025 7:27 PM

views 44

आयसीएआर मधली सर्व रिक्त पद लवकरात लवकर भरावीत- कृषीमंत्री

भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआर मधली सर्व रिक्त पद लवकरात लवकर भरावीत असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कृषी विद्यार्थी संमेलनात बोलत होते. आपण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून  त्यांना राज्याच्या कृषी मंत्र्यांशी बोलून ही पदं तात्काळ भरण्याबाबत सूचवणार असल्याचंही ते म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार या क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणं आवश्यक असून शेतकरी आणि कृषी क्षेत्रात देशात क्रांती आणण्याची क्षमता असल्याचंही त्यांनी सांगि...

September 30, 2025 7:35 PM September 30, 2025 7:35 PM

views 27

ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करणार

देशातल्या ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत एक विशेष पथक स्थापन केलं जाईल, असं केंद्रीय कृषी आणि ग्राम  विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषित केलं आहे. ते आज नवी दिल्लीत शाश्वत ऊस अर्थव्यवस्थेवरच्या राष्ट्रीय सल्लामसलत बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. हे पथक, शेतकरी, वैज्ञानिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित लाभधारकांच्या सूचनांना अनुसरून, ऊस उत्पादन धोरण आणि संशोधन विषयक दिशानिर्देश तयार करेल, असं ते यावेळी म्हणाले. हे सं...

September 20, 2025 11:30 AM September 20, 2025 11:30 AM

views 52

कमी झालेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांना द्या – कृषी मंत्र्यांचे निर्देश

ट्रॅक्टर आणि शेतीसाठीच्या इतर साधनांवरच्या कमी केलेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा सूचना केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या.   शेतीच्या अवजारांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरकपातीचा फायदा मध्यस्थांच्या खिशात न जाता थेट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि याचा प्रभाव येत्या 22 तारखेपासूनच दिसायला हवा असं चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं

September 19, 2025 1:46 PM September 19, 2025 1:46 PM

views 31

शेती उपकरणांशी संबधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं-कृषी मंत्री

कृषीवापरासाठीच्या उपकरणांशी संबधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं आहे.   यामुळे  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा फरक पडेल, असं ते म्हणाले. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांवरचा कर १२ ते १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या सुधारणेचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याबाबत नवी दिल्ली इथं चौहान यांनी एक बैठक घेतली.

June 24, 2025 6:06 PM June 24, 2025 6:06 PM

views 3

पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारची पीकनिहाय मोहीम सुरू

पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार पीकनिहाय मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेची सुरुवात सोयाबीन पिकापासून इंदूर इथं होईल, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. या मोहिमे अंतर्गत शेतकरी, शास्त्रज्ञ आणि शेतीशी संबंधित लोक एकत्र येऊन सोयाबीनचं उत्पादन वाढवण्याविषयी चर्चा करतील. त्यानंतर कापूस, ऊस आणि तेलबियांसंबंधी अशी चर्चा आयोजित केली जाईल, असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

June 7, 2025 8:07 PM June 7, 2025 8:07 PM

views 3

शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर विकसित भारताची निर्मिती अवलंबून-शिवराजसिंह चौहान

शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर विकसित भारताची निर्मिती अवलंबून आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत मध्यप्रदेशातल्या सेहोर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ सल्ला ऐकून शेतीत सुधारणा करावी असं चौहान म्हणाले. या कार्यक्रमात ५१ कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. प्रधानमंत्री आवाज योजने अंतर्गत सूचिबद्ध असलेल्या कुटुंबांना घरं बांधायला चौहान यांनी यावेळी मान्यता दिली. 

June 2, 2025 1:39 PM June 2, 2025 1:39 PM

views 16

विकसित भारतासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक-शिवराजसिंह चौहान

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. बिहारमधल्या मोतिहारी इथं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याबाबत आयोजित केलेल्या चर्चेत ते आज बोलत होते. देशभरात १६ हजार शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. उत्पादनात वाढ करणं, उत्पादन खर्च कमी करणं, आणि शेतमालासाठी दर सुनिश्चित करणं यावर ते काम करत असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. सरकार डाळी, तेलबिया यांच्या लागवडीला प्रोत्साहन देत असून शेती अधिक ...

April 8, 2025 7:11 PM April 8, 2025 7:11 PM

views 3

नवी दिल्लीत कृषी क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि इस्रायलचे कृषीमंत्री अवी डिचर यांनी आज नवी दिल्लीत कृषी क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. आगामी काळात अन्न सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या रणनीतीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. वाढतं तापमान आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करणारे, अधिक उत्पादन सुनिश्चित करणारे बियाणे विकसित करण्यावर भर देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेती अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं...

April 7, 2025 8:17 PM April 7, 2025 8:17 PM

views 17

राज्य सरकारनं मागणी केल्यास शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत दिली जाईल-कृषीमंत्री

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विमा आणि अन्य योजनांतून केंद्र सरकार पैसा पुरवत आहेच पण आवश्यकतेप्रमाणे राज्य सरकारनं मागणी केल्यास अतिरिक्त मदत दिली जाईल, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज सांगितलं.  नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडपम आणि महिला तंत्रज्ञान पार्कचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर उपस्थित होते. शेतामालाला रास्त भाव मिळावा म्हणून शासन प्रयत्नशील असून गरजेनु...