डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर विकसित भारताची निर्मिती अवलंबून-शिवराजसिंह चौहान

शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर विकसित भारताची निर्मिती अवलंबून आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत मध्यप्रदेशातल्या सेहोर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ सल्ला ऐकून शेतीत सुधारणा करावी असं चौहान म्हणाले. या कार्यक्रमात ५१ कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. प्रधानमंत्री आवाज योजने अंतर्गत सूचिबद्ध असलेल्या कुटुंबांना घरं बांधायला चौहान यांनी यावेळी मान्यता दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा