खेळ

April 22, 2025 2:32 PM April 22, 2025 2:32 PM

views 2

बुद्धिबळ ग्रँड पिक्समध्ये कोनेरू हम्पीची विजयी आघाडी

भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने चीनच्या झू जिनरवर विजय मिळवत बुद्धिबळ ग्रँड प्रिक्समध्ये आघाडी घेतली. पुण्यात सुरु असलेल्या या स्पर्धेत मंगोलियाच्या बटखुयाग मुगुंटलवर  विजय मिळवत दिव्या देशमुखने ही स्पर्धेतली आघाडी कायम ठेवली आहे.   आज तिची गाठ चीनच्या झ्यू जीनरशी पडेल. स्पर्धेची आठवी फेरी आज...

April 22, 2025 2:24 PM April 22, 2025 2:24 PM

views 8

IPL: आज लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान लखनऊ इथं सामना होणार आहे.  संध्याकाळी  साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.    दरम्यान, काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ३९ धावांनी पराभव केला. गुजरातनं १९९ धावांचं लक्ष्य दिलं हो...

April 18, 2025 2:45 PM April 18, 2025 2:45 PM

views 8

स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानीचा उपांत्य फेरीत प्रवेश

मलेशियात क्वालालंपूर इथे झालेल्या स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानी याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने मलेशियाच्या सैफिक कमाल याचा ९-११, ११-६, ११-६, ११-७ असा पराभव केला. या स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात मात्र भारताच्या तन्वी खन्ना हिला उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या हे...

April 17, 2025 3:30 PM April 17, 2025 3:30 PM

views 11

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अभिषेक नायर आणि इतर दोन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना केलं पदमुक्त

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि इतर दोन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना पदमुक्त केलं आहे. बॉर्डर- गावस्कर चषक मालिकेत भारतीय संघाची कामगिरी समाधान कारक झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशिक्षक म्हणून तीन वर्षांची सेवा झालेल्यांन...

April 17, 2025 2:01 PM April 17, 2025 2:01 PM

views 2

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायर्जस हैदराबाद बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायर्जस हैदराबाद बरोबर होईल. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

April 17, 2025 11:28 AM April 17, 2025 11:28 AM

views 11

आयपीएल – दिल्ली कॅपिटल्स कडून राजस्थान रॉयल्सचा पराभव

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं काल रात्री झालेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं ५ गडी बाद १८८ धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं वीस षटकांमध्ये तेवढ्याच धावा केल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. स्...

April 17, 2025 9:53 AM April 17, 2025 9:53 AM

views 10

ISSF: भारताच्या इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरीला १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक

जागतिक नेमबाजी संघटनेच्या म्हणजे आयएसएसएफच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरी यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. त्यांनी चीनच्या कियानझून याओ आणि कैहू यांचा १७-९ असा पराभव केला. पेरूतील लिमा इथं ही स्पर्धा सुरू आहे. आज महिलांच्या स्किट स्पर्धेत ...

April 16, 2025 4:00 PM April 16, 2025 4:00 PM

views 7

वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला रोहित शर्मा ह्याचं नाव

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.  आणखी दोन स्टँडचं नामकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांच्या नाव...

April 16, 2025 1:30 PM April 16, 2025 1:30 PM

views 6

लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश

येत्या २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असून त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या पोमोना इथे एक स्टेडियम बनवण्यात येणार आहे. ही जागा ५०० एकरात पसरलेली आहे. १४ जुलै ते ३० जुलै २०२८ या दरम्यान अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. यात क्रिकेट प्रकारात महिला आणि पुरुष...

April 15, 2025 2:58 PM April 15, 2025 2:58 PM

views 11

आयपीएल – पंजाब सुपर किंग्ज चा सामना आज कोलकाता नाईट राईर्डसबरोबर होणार

आयपीएल टी २० क्रिकेटमध्ये, आज पंजाब सुपर किंग्ज चा सामना कोलकाता नाईट राईर्डसबरोबर होणार आहे. पंजाबच्या चंदीगढ स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. काल रात्री चेन्नई सुपर किंग्ज ने लखनौ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून मात करत सामना जिंकला.