प्रादेशिक बातम्या

July 20, 2025 6:50 PM July 20, 2025 6:50 PM

views 21

मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात आज जनता दरबाराचं आयोजन केलं गेलं. यावेळी गोयल यांनी नागरिकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी नागरिकांनी महानगरपालिका, गृहनिर्माण संस्था, पोलीस विभागांशी संबंधित आपल्या तक्रारी मांडल्या. तातडीनं या समस्या सोडवाव्य...

July 20, 2025 6:50 PM July 20, 2025 6:50 PM

views 9

राज्य महोत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार – मंत्री आशिष शेलार

राज्य महोत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाईल, असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. पेणमध्ये हमरापूर, जोहे, कळवे या गावातील मुर्तीकारांच्या विविध संघटनांच्या वतीनं आज शेलार यांचा तांबडशेत इथं सत्कार केला गेला त्यावेळी ते बोलत होते. पीओपीच्या मूर्तींवरच्या ब...

July 20, 2025 3:23 PM July 20, 2025 3:23 PM

views 34

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत आढावा बैठक घेतली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातील भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली.   काशी-उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्याचं नियोजन आह...

July 20, 2025 3:38 PM July 20, 2025 3:38 PM

views 12

नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटनाच्या दृष्टीने विकास प्रकल्प हाती घेणार – प्रताप सरनाईक

धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने भव्य विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. पालकमंत्री सरनाईक यांनी आज २० जुलै रोजी नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली, आणि  सध्याच्या परिस्थितीचा आढावा...

July 20, 2025 3:14 PM July 20, 2025 3:14 PM

views 19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

श्री संत नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज, पंढरपूर यांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. संत नामदेव महाराज यांच्या ६७५व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या गुरुवारी २४ जुलै रोजी पंढरपुरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे....

July 20, 2025 2:51 PM July 20, 2025 2:51 PM

views 2

पनवेल रेल्वे स्थानकावर परदेशी महिलेकडून अंमली पदार्थ जप्त

पनवेल रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिला प्रवाशाकडून दोन किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. मंगला एक्स्प्रेस मधून ३५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या या नायजेरियन महिलेला बंगळुरु अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि पनवेल रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त अभियानात अटक करण्यात आली. पुढील ...

July 19, 2025 8:22 PM July 19, 2025 8:22 PM

views 18

संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून, उद्या सर्वपक्षीय बैठक

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता  सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या प...

July 19, 2025 8:23 PM July 19, 2025 8:23 PM

views 21

भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा आर्थिक भागिदारी करार १ ऑक्टोबरपासून लागू होणार

भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा व्यापार आणि आर्थिक भागिदारी करार १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज केली. यामुळं देशात १० लाखांहून अधिक रोजगारांची निर्मिती होईल, असं ते म्हणाले.    युरोपियन मुक्त व्यापार संघटनेत आइसलँड, लिंचेस्टाइन...

July 19, 2025 8:05 PM July 19, 2025 8:05 PM

views 22

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचं उद्घाटन

ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचं उद्घाटन आज ठाण्याच्या कोरस आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या अभियानाअंतर्गत पुढच्या ३ महिन्यात ५ लाख महिलांची वैद्यकीय तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. विशेषतः गर्भाशयमुखाचा कर्करोग,...

July 19, 2025 6:30 PM July 19, 2025 6:30 PM

views 5

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह आणि उपकरण खरेदीसाठी साडे चारशे कोटी रुपयांहून अधिक तरतूद झाली आहे.