प्रादेशिक बातम्या

July 19, 2025 6:12 PM July 19, 2025 6:12 PM

views 3

कांदळवनाची पुनर्स्थापना करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आदेश

कांदळवनाच्या परिसरात बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरचे भराव हटवून मूळ कांदळवनाची पुनर्स्थापना  करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. त्या आज अंधेरी इथल्या लोखंडवाला बॅक रोड परिसरात कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पाहणी केल्यानंतर बोलत होत्या. कांद...

July 19, 2025 3:50 PM July 19, 2025 3:50 PM

views 19

रूपाली चाकणकर यांनी हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला दिली भेट

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. पीडित महिलांनी आणि विद्यार्थिनीनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडवावेत असं आवाहन यावेळी चाकणकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

July 19, 2025 3:40 PM July 19, 2025 3:40 PM

views 6

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन  रेल्वेनं येत्या २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावपर्यंत तसंच पुणे स्थानकापासून रत्नागिरीपर्यंत गाड्या प्रवास करतील. दिवा ते चिपळूण पूर...

July 19, 2025 3:37 PM July 19, 2025 3:37 PM

views 26

अभियान आणि प्रशासकीय गुणवत्ता पुरस्कारांचं वितरण

मुंबई विद्यापीठाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क पुरस्कार, प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि प्रशासकीय गुणवत्ता पुरस्कारांचं वितरण काल झालं. तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.   डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्राध...

July 19, 2025 9:30 AM July 19, 2025 9:30 AM

views 8

देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं मुंबईत उद्घाटन

देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं म्हणजेच आयआयसीटीचं उद्घाटन काल मुंबईत झालं. केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारात उभारलेल्या या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं.  ...

July 18, 2025 8:01 PM July 18, 2025 8:01 PM

views 17

‘जनसुरक्षा विधेयक’ हे लोकशाही पद्धतीनं तयार केलं गेलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही पद्धतीने, विरोधी पक्षांच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तयार केलं गेलं, याबाबतच्या समितीतल्या कुणीही असहमती दर्शवली नाही, मात्र विरोधकांनी नंतर दबाव आल्यामुळे सभागृहात वेगळी भूमिका घेतली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पावसाळी अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना ...

July 18, 2025 7:10 PM July 18, 2025 7:10 PM

views 9

हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा

विधान भवनात काल झालेल्या हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. एका आठवड्यात याचा निर्णय होईल अशी घोषणा अध्यक्षांनी केली. तसंच, मंत्र्यांनीही विधिमंडळात बैठक घेऊ नये, असं आवाहनही अध्यक्षांनी केलं. हे प्रकरण व...

July 18, 2025 7:04 PM July 18, 2025 7:04 PM

views 159

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. विधिमंडळाचं यापुढचं, हिवाळी अधिवेशन नागपुरात ८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.    या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण १५ बैठका झाल्या यात १३३ तास ४८ मिनिटं कामकाज झालं. अधिवेशन काळात १४ विधेयकं पुनर्स्थापित झाली, तर १५ विधेयकं संमत झाली. एक विध...

July 18, 2025 7:17 PM July 18, 2025 7:17 PM

views 9

मुंबईला कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुढची हजारो वर्षे कुणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी सभागृहात आरोप करताना नीट पुरावे ...

July 18, 2025 7:22 PM July 18, 2025 7:22 PM

views 7

अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नसल्याची उद्धव ठाकरेंची टीका

मुख्यमंत्र्यांचं भाषण ही स्वप्नरंजन गुटिका होती, या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनाच्या आवारात बातमीदारांशी बोलताना केली. लोकांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं की नाही, त्यावर उपाययोजना केल्या की नाही, याचं उत्तर या अधिवेशनातून मिळालं नाही,...