प्रादेशिक बातम्या

August 11, 2025 3:02 PM August 11, 2025 3:02 PM

views 3

मुंबईतल्या कबुतरखान्यांसदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबईतल्या कबुतरखान्यात कबुतरांना खायला घालू नये या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला नकार देत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज दिले. याचिकाकर्त्यांनी आदेशात बदल करण्याची विनंती उच्च न्यायालयात करावी ...

August 11, 2025 3:00 PM August 11, 2025 3:00 PM

views 2

तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त राज्यातल्या शिव मंदीरांमध्ये गर्दी

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं आज राज्यातल्या शिव मंदीरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.   मराठवाड्यात वेरुळ इथलं घृष्णेश्वर, परळी इथलं वैद्यनाथ आणि औंढा इथल्या नागनाथ, या ज्योतिर्लिंग स्थळीदेखील नागरिक मोठ्या संख्येनं दाखल होत आहे. स्थानिक प्रशासनांनी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी अनेक ...

August 10, 2025 6:46 PM August 10, 2025 6:46 PM

views 7

राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याअंतर्गत आज पनवेल महानगरपालिकेतर्फे तिरंगा सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. ३००पेक्षा जास्त सायकलस्वारांनी या फेरीत भाग घेतला. या अभियानांतर्गत नांदेड महापालिकाही २ ऑगस्टपासून अनेक उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून आज हडको इथून त...

August 10, 2025 6:39 PM August 10, 2025 6:39 PM

views 5

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ५ हजार १४० कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी

नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाकडे सादर केलेल्या सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यापैकी ५ हजार १४० कोटी रुपयांच्या विविध कामांना कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. तसंच महापालिकेच्या साडेसात हजार कोटी रुपये खर्चात कपात करून ३ हजार २०० कोटी रुपयांची कामं...

August 10, 2025 6:29 PM August 10, 2025 6:29 PM

views 4

जळगावात रानभाजी महोत्सवाचं आयोजन

जळगावात  जळगाव प्रकल्प संचालक, जिल्हा अधिक्षक, कृषी विज्ञान केंद्र यांनी संयुक्तपणे रानभाजी महोत्सवाचं आयोजन नुकतंच केलं. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या महोत्सवाला भेट दिली. शेतकरी गट तसंच महिला बचत गटांनी पारंपरिक  पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांचं आणि प्रक्रिया उद्योगाचे स्टॉल  महोत्सवा...

August 10, 2025 6:18 PM August 10, 2025 6:18 PM

views 7

जव्हारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण

पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये आज दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं  लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. आदिवासीबहुल जव्हार तालुक्यामधल्या  नागरिकांना आता न्याय मिळविण्यासाठी लांब प्रवास करावा लागणार नाही. अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा नव्या न्याय...

August 10, 2025 6:12 PM August 10, 2025 6:12 PM

views 7

घाटकोपरमधल्या पंतनगर बस स्थानकावर स्टील स्पॅन बसवण्याचं काम पूर्ण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA ने घाटकोपर पूर्व भागातल्या पंतनगर बस स्थानकावर स्टील स्पॅन बसवण्याचं महत्वाचं काम पूर्ण केलं. या स्पॅनची लांबी ५८ मीटर आणि वजन साडेचारशे टन होतं आणि शंभरहून अधिक कामगार, आवश्यक सुरक्षा कर्मचारी, अभियंते यांनी पाच स्टील गर्डर्सवर तो बसवण्याचं काम यशस्व...

August 10, 2025 6:09 PM August 10, 2025 6:09 PM

views 8

पुढचा आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज

पुढचा आठवडाभर राज्यातल्या चारही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक...

August 10, 2025 3:54 PM August 10, 2025 3:54 PM

views 6

वाशिममध्ये हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या मोहिमेंतर्गत रॅलीचं आयोजन

वाशिम जिल्ह्यातल्या पंचायत समिती कारंजा इथल्या शिवन बुद्रुक इथं काल हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या मोहिमेंतर्गत रॅली निघाली. शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी सार्वजनिक स्वच्छता मोहिम राबवली. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग तसंच जल आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयाने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता...

August 10, 2025 3:43 PM August 10, 2025 3:43 PM

views 1

बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू

राज्यातल्या ४५३ विशेष शाळांमध्ये बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्थेनं हा अभ्यासक्रम प्रमाणित  केला आहे.  राज्याचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जय...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.