प्रादेशिक बातम्या

August 7, 2025 3:05 PM August 7, 2025 3:05 PM

views 8

मुंबई विमानतळावर साडे १४ किलो वजनाचा गांजा जप्त

मुंबईतल्या विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी साडे १४ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. याची किंमत अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी एक जणाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ ऑगस्टच्या रात्री एक संशयीत प्रवासी जकात अधिकाऱ्यांना आढळून आला. त्याची तपा...

August 7, 2025 1:34 PM August 7, 2025 1:34 PM

views 6

गडचिरोलीत ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थी एका ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी पडले. तर अन्य दोघे जखमी झाले.  त्यानंतर संतप्त नागरिकांनी हा महामार्ग रोखून धरला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी हवाईमार्गे नागपूरला नेण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र...

August 6, 2025 3:49 PM August 6, 2025 3:49 PM

views 4

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे, महागाई दराचा अंदाज आणखी घटवला

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो दर साडे ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. याशिवाय इतरही दर जैसे थे राहणार आहे.    चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्र...

August 5, 2025 7:59 PM August 5, 2025 7:59 PM

views 4

नॅकच्या मूल्यांकनाकडे सातत्यानं केलेल्या दुर्लक्षाची गंभीर दखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅकच्या मूल्यांकनाकडे सातत्यानं केलेल्या दुर्लक्षाची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनानं घेतली आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या ११६ महाविद्यालयांना नव्यानं होणाऱ्या बायनरी...

August 5, 2025 7:43 PM August 5, 2025 7:43 PM

views 1K

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून ती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सुरू असून प्रभाग रचना, मतदार याद्या या सर्व प...

August 5, 2025 7:31 PM August 5, 2025 7:31 PM

views 13

एसटीच्या अतिरीक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापराच्या सुधारित धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आली.   राज्य मंत्रीमंडळाच्या आज ...

August 5, 2025 7:17 PM August 5, 2025 7:17 PM

views 26

नागरिकांना रिक्षा, टॅक्सीची सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार छावा राइड ॲप सुरू करणार

ओला, उबेर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार ‘छावा राइड’ या ॲपच्या माध्यमातून राज्य सरकार नागरिकांना खासगी वाहतूक सुविधा पुरवणार आहे.   या ॲपवरुन नागरिकांना रिक्षा, टॅक्सी आणि बसचे आरक्षण करता येईल. एसटी महामंडळ हे ॲप सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

August 5, 2025 7:13 PM August 5, 2025 7:13 PM

views 7

आगामी ४ दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात आजपासून पुढचे चार दिवस अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.   कोकण तसंच गोव्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तामिळनाडूच...

August 5, 2025 3:39 PM August 5, 2025 3:39 PM

views 9

महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण परत आणावी, ही जनभावना लक्षात घेत, राज्य शासन या संदर्भात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. महादेवी हत्तिणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्ष...

August 5, 2025 5:11 PM August 5, 2025 5:11 PM

views 40

पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत, कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा – मुख्यमंत्री

कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मुंबई महापालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यां...