प्रादेशिक बातम्या

September 9, 2025 8:42 PM September 9, 2025 8:42 PM

views 22

नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात

नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत वितरित झाला. राज्यातल्या साडे ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार याप्रमाणे सुमारे १९०० कोटी रुपये जमा होतील. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या महिन्यांचे अ...

September 9, 2025 3:37 PM September 9, 2025 3:37 PM

views 14

रायगड जिल्ह्यात ओएनजीसी प्रकल्पाच्या गँस प्रोसेसिंग विभागात स्फोट

रायगड जिल्ह्यात उरण इथल्या ओएनजीसी प्रकल्पाच्या गँस प्रोसेसिंग विभागात काल स्फोट होऊन परिसरातल्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.    गॅस पाईपलाईन गरम झाल्यानं ही दुर्घटना झाल्याचा अंदाज असून स्फोटानंतर आगीचे लोट पसरले होते. परिसरातल्या घरांना हादरे बसले, काचा, तावदाने फुटली.. मात्र सुदैवानं...

September 9, 2025 3:10 PM September 9, 2025 3:10 PM

views 7

उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.   अतिउच्चदाब, उच्चदाब, आणि लघुदाब उपसा जलसिंचन, अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलत मिळत असल्यानं या मुदतवाढ...

September 8, 2025 8:34 PM September 8, 2025 8:34 PM

views 19

भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार होईल-मुख्यमंत्री

व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वं आहेत, या व्हिजन नुसार भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली ...

September 8, 2025 3:52 PM September 8, 2025 3:52 PM

views 4

ई-पीक पाहणीला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

परभणी जिल्ह्यात धारणगाव इथं ई-पीक पाहणीला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीतून शेताकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात पडला.   या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबासह जिल्हा प्रशासनाने शोध कार्य सुरू केलं. मात्र, त्याचा मृतदेह घटनास्थळापासून पुढे काही...

September 7, 2025 3:54 PM September 7, 2025 3:54 PM

views 16

राज्यात ठिकठिकाणी भक्तीभावानं गणरायाला निरोप

राज्यात इतरत्रही भक्तीभावानं गणरायाला निरोप दिला गेला. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगांच्या तालावर गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत होतं. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालं, मात्र काही ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुर...

September 7, 2025 2:30 PM September 7, 2025 2:30 PM

views 10

अनंतचतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

देशभरात काल अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता झाली. पुढच्या वर्षी लौकर येण्याचं आवाहन करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईत अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे. कालपासून गिरगाव चौपाटीसह विविध व...

September 6, 2025 5:34 PM September 6, 2025 5:34 PM

views 65

राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध

राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध झाला. या समितीत भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ञ डॉ. अपर्णा...

September 6, 2025 3:20 PM September 6, 2025 3:20 PM

views 18

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  तसंच  पूर्व राजस्थान आणि गुजरातसाठी  उद्यापर्यंत पावसाचा  रेड अलर्ट जारी केला आहे.  अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराख...

September 6, 2025 10:32 AM September 6, 2025 10:32 AM

views 22

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्याच्या २९ जिल्ह्यांमधल्या १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झालं आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.