प्रादेशिक बातम्या

September 12, 2025 9:04 PM September 12, 2025 9:04 PM

views 13

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला १० लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

एन पी सी आय नं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या युपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या १५ तारखेपासून हा बदल लागू होईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून, किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यांसारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत ...

September 12, 2025 9:05 PM September 12, 2025 9:05 PM

views 15

म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क ५ टक्क्यावरून ३ टक्के करण्याचा सेबीचा निर्णय

म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क ५ टक्क्यावरून ३ टक्के करण्याचा निर्णय सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं घेतला आहे. सेबीचे अध्यक्ष तूहीन कांत पांडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतव...

September 12, 2025 9:02 PM September 12, 2025 9:02 PM

views 523

राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत जाहीर

राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत  आज जाहीर झाली. त्यानुसार परभणीआणि वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहील तर चंद्रपूर, बीड इथं अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित राहील.   अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पालघर आणि ...

September 12, 2025 6:02 PM September 12, 2025 6:02 PM

views 5

धरणांमधला गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश

धरणांमधला गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वित्त आणि नियोजन विभागाने केलेल्या सूचना विचारात घेऊन हे प्रस्ताव तयार करावे असंही सांगितलं. पूरनियंत्रणाबरोबरच धरणांची साठवण क्षमता वा...

September 12, 2025 1:42 PM September 12, 2025 1:42 PM

views 2.5K

देशाचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली शपथ

देशाचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जगदीप धनखड, हमीद अन्सारी, एम वेंकय्या नायडू हे माजी उपर...

September 12, 2025 10:05 AM September 12, 2025 10:05 AM

views 37

राज्यात एक लाख ९ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. नुकतेच राज्यात एक लाख नऊ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार करण्यात आले असून त्यातून 47 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये दिली. इंडिया-ऑस्ट्रेलिया ब...

September 11, 2025 7:21 PM September 11, 2025 7:21 PM

views 5

मराठा आरक्षणासंदर्भात जीआर मागे घ्यावा- ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ

मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरमधली संदिग्धता दूर करावी किंवा हा जीआर मागे घ्यावा अशी मागणी ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमधे वार्ताहर परिषदेत केली. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचं प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, आरक्षणासारख्या संवैधानिक विषयात अशा प्रक्रियेचा अवलंब करणं धोकादायक आहे,...

September 11, 2025 7:00 PM September 11, 2025 7:00 PM

views 11

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा, तात्पुरता कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे

 सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला आहे.

September 11, 2025 6:49 PM September 11, 2025 6:49 PM

views 91

आपले सरकार वेबसाइटची सुधारित आवृत्ती २ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे आदेश – मुख्यमंत्री

आपले सरकार वेबसाइटची लोकाभिमुख, सुधारित आवृत्ती २ ऑक्टोबरपर्यंत सुरू करा. इतर विविध वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या सेवा आणि योजना या वेबसाइटवर उपलब्ध करुन द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. आतापर्यंत सेवा हक्क हमी कायद्यामध्ये सेवांचीच हमी दिली जात ...

September 11, 2025 4:32 PM September 11, 2025 4:32 PM

views 3

दंगलीचा तपास करण्यासाठी अकोला इथं विशेष तपास पथकाची स्थापना

अकोला इथं २०२३ मधे झालेल्या दंगलीचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या अध्यतेखालील पिठानं हा आदेश दिला.    या दंगलीत जखमी झालेल्या व्यक्तीनं विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.