प्रादेशिक बातम्या

June 24, 2024 1:01 PM June 24, 2024 1:01 PM

views 14

लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून उलटल्यानंतर त्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला...

June 24, 2024 11:20 AM June 24, 2024 11:20 AM

views 2

‘मधुमित्र’ पुरस्कारासाठी अंबड गावातील राजू कानवडे यांची निवड

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या 'मधुमित्र' पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या अंबड गावातील शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशापालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून मधमाशांची भुमिका महत...

June 24, 2024 10:57 AM June 24, 2024 10:57 AM

views 9

पुण्यातील पबमध्ये अमली पदार्थ विक्रीसंदर्भात ५ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक अल्पवयीन मुलगा अमली पदार्थांचं सेवन करत असतानाचा व्हिडिओ समाज मध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुणे पोलिसांनी काल संबंधित हॉटेलवर कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान ही अत्यंत गंभीर...

June 23, 2024 7:46 PM June 23, 2024 7:46 PM

views 24

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे,   वाश...

June 23, 2024 7:36 PM June 23, 2024 7:36 PM

views 15

खेळांमध्ये मुला-मुलींना समान संधी देण्यास प्राधान्य – क्रीडामंत्री संजय बनसोडे

खेळांमध्ये मुला-मुलींना समान संधी देण्यास प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाही राज्येच क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालयानालयाच्या सहकार्याने पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा क्रीडा संकुलांना ...

June 23, 2024 7:21 PM June 23, 2024 7:21 PM

views 13

नागपूर : आशा स्वयंसेविकांना मोबाईल फोनचं वितरण

नागपूरमध्ये १३ तालुक्यातल्या आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मोबाइल फोनचं वितरण केलं. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठानच्या सौजन्यानं आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या्ानाल्ीो माध्यमातून अधिक सक्षमीकरणाचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्ग...

June 23, 2024 7:16 PM June 23, 2024 7:16 PM

views 11

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात क्रमांक पटकावणाऱ्या शाळा बक्षिस वितरण

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात नागपूर जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बक्षिसं देण्यात आली. देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशीष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ....

June 23, 2024 3:39 PM June 23, 2024 3:39 PM

views 20

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची जयंत पाटील यांची मागणी

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट-पीजी पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी  केंद्र सरकारवर टीका केली आहे.   विविध प्रवेशपरीक्षांवरच्या आक्षेपांच्...

June 23, 2024 12:10 PM June 23, 2024 12:10 PM

views 16

उद्योग व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय आणि संवाद असणे आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक ज्ञानातून निर्माण होणारे संशोधन आणि परिसरातील विकास हे परस्पर पूरक असायला हवे, उद्योग विकासाकरिता त्या क्षेत्रातील उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये समन्वय आणि संवाद असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकर...

June 23, 2024 3:49 PM June 23, 2024 3:49 PM

views 27

राज्यात आज ठिकठिकाणी जागतिक ऑलिम्पिक दिनाचं आयोजन

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्यावतीनं आज जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांम...