प्रादेशिक बातम्या

June 22, 2024 7:14 PM June 22, 2024 7:14 PM

views 13

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी संदर्भात अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राज्य सरकारचं आवाहन

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा पारदर्शक असून विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण अभ्...

June 22, 2024 6:47 PM June 22, 2024 6:47 PM

views 16

आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित

ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचं जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं सुरू असलेलं उपोषण आज स्थगित करण्यात आलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहर परिषदेत हाके यांनी ही घोषणा केली. आपल्या दोन मागण्या मान्य झाल्या असून मराठा आरक्षणासाठीचा सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश सर्वपक्षीय बैठक...

June 22, 2024 3:36 PM June 22, 2024 3:36 PM

views 10

राज्याचा बहुतांश भाग नैर्ऋत्य मोसमी पावसानं व्यापला

राज्याचा बहुतांश भाग नैर्ऋत्य मोसमी पावसानं व्यापला असून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत  अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.  खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. ठाणे शहरात काल रात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटा...

June 22, 2024 2:47 PM June 22, 2024 2:47 PM

views 9

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. लोकसभा निवडणुकीत जिथेकमकुवत होतो, तिथे अधिक मेहनत करू असं बावनकुळे यांनी ब...

June 22, 2024 1:09 PM June 22, 2024 1:09 PM

views 2

विज्ञान भारती संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार

विज्ञान विषयाबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या विज्ञान भारती या संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन आज आणि उद्या पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार आहे. विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएस-आयआर-चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जीतें...

June 21, 2024 8:17 PM June 21, 2024 8:17 PM

views 12

जहाल नक्षलवादी संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेमचं गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण

२ हजार १३ सालापासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या, सालेकसा तालुक्यातल्या पोलिसांच्या चकमकीत सहभाग असलेल्या जहाल नक्षलवाद्यानं, गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम असं आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचं नाव असून तो मूळचा छत्तीसगढचा आहे. शासनानं त्याच्यावर ७ लाखाचं  बक...

June 21, 2024 8:14 PM June 21, 2024 8:14 PM

views 9

नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये कचरा किंवा राडारोडा न टाकण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नाल्यातला गाळ काढण्याचं काम नियमितपणे केलं जातं. पावसाळापूर्व काळात मुंबई शहरातल्या लहानमोठ्या नाल्यांतला गाळ काढण्यात आला आहे. परंतु, नाल्यांमध्ये आसापासच्या नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याचं  आढळून येतं. नदी, नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचर...

June 21, 2024 8:06 PM June 21, 2024 8:06 PM

views 7

काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी विभागानं ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.  जम्मू आणि काश्मीर सरकारनं बडगाम जिल्ह्यातल्या इच्चगाम ...

June 21, 2024 7:59 PM June 21, 2024 7:59 PM

views 11

नाना पटोले यांनी केली अटल सेतूची पाहणी

शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारनं १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढलं आहे, हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतूची पाहणी केली आणि रस्त्याला भेगा पडल्य...

June 21, 2024 7:36 PM June 21, 2024 7:36 PM

views 10

नंदूरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मौसमी पाऊस दाखल

उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मौसमी पावसाचं आगमन झालंय.  गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली.  रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या सूर्...