प्रादेशिक बातम्या

June 25, 2024 7:56 PM June 25, 2024 7:56 PM

views 6

नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूरमध्ये अटक

नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयापुढं आज हजर केलं असता न्यायालयानं त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.   याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण चार जणांवर गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत त्यापैकी २ ...

June 25, 2024 7:53 PM June 25, 2024 7:53 PM

views 16

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१२ अंकांची वाढ नोंदवत ७८,००० वर बंद

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा ७८ हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर सेन्सेक्स ७१२ अंकांची वाढ नोंदवत, ७८ हजार ५४ अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं ७८ हजार १६५ अंकांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता.   निफ्टीनंही आज पहिल्यांदाच २३ हजार ७०० अंकांची पात...

June 25, 2024 7:47 PM June 25, 2024 7:47 PM

views 20

पंढरपुरात ४ ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचं यंदा दुसरं वर्ष असून वारकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्य विभाग पंढरपूर इथं चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी याहीवेळी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि...

June 25, 2024 7:38 PM June 25, 2024 7:38 PM

views 9

पोलिसांनी नवीन फौजदारी कायदे आत्मसात करावेत – उपविभागीय पोलीस अधिकारी बाबू रोहम

देशात १ जुलैपासून भारतीय न्याय संहिता लागू होत आहे. त्यामुळे पोलिसांनी नवीन फौजदारी कायदे आत्मसात करावेत, असं ग्रामीण पोलीस दलातले उपविभागीय पोलीस अधिकारी बाबू रोहम यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात नवीन फौजदारी कायदे - २०२४ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत ...

June 25, 2024 7:30 PM June 25, 2024 7:30 PM

views 14

‘बेस्ट’ बससेवेला आर्थिक सहाय्य करण्याची आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या ‘बेस्ट’ बस सेवेला आर्थिक सहाय्य करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रद्वारे केली आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्टकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. बेस्ट बसची भाडेवाढ करू नये, कर्मचाऱ...

June 25, 2024 7:23 PM June 25, 2024 7:23 PM

views 13

‘दरड कोसळल्यानं किंवा भूस्खलनानं गाडल्या गेलेल्या गावातल्या बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा’

राज्यात दरड कोसळल्यानं किंवा भूस्खलनानं गाडल्या गेलेल्या गावातल्या बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, आणि गावातल्या बाधितांना न्याय मिळणार आहे. कोयना जलविद्य...

June 25, 2024 7:02 PM June 25, 2024 7:02 PM

views 12

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या खरीप पिकांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचं वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी घ...

June 25, 2024 6:55 PM June 25, 2024 6:55 PM

views 12

शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३ व्या बैठकीत बोलत होते. शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. बँकानीही शेतकऱ्यांना ...

June 25, 2024 3:58 PM June 25, 2024 3:58 PM

views 16

यवतमाळमध्ये दिव्यांग्यांच्या पंढरपूर वारीचं आयोजन

राज्यातली पहिलीच पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूर वारी यवतमाळच्या दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने दृष्टिहीन वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी आज निघाले. संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादूका घेऊन आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, पर...

June 25, 2024 3:50 PM June 25, 2024 3:50 PM

views 18

भाजपा नेत्या सुर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या सुर्यकांता पाटील यांनी आज मुंबईत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्ष नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. भविष्यातल्या लढाईसाठी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू,असं पाटील याव...