प्रादेशिक बातम्या

September 10, 2024 8:20 PM September 10, 2024 8:20 PM

views 14

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती स्थापन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. त्यात तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख, विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश असल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी प...

September 10, 2024 6:58 PM September 10, 2024 6:58 PM

views 9

ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

आगामी ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. राष्ट्रीय हरित लवादानं याआधीच गणेश...

September 10, 2024 3:26 PM September 10, 2024 3:26 PM

views 8

जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे पुन्हा उघडले, पाणीपातळीत वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १५ हजार ४६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक व...

September 10, 2024 7:15 PM September 10, 2024 7:15 PM

views 17

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी मुर्तीकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याप्रकरणी मुर्तीकार जयदीप आपटे याची पोलिस कोठडी न्यायालयानं येत्या शुक्रवारपर्यंत वाढवली आहे. दुसरा आरोपी चेतन पाटील याला न्यायालयानं १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांची पोलीस कोठडी आज संपल्यानं दोघांना आज न्यायालयात हजर केलं होतं.

September 10, 2024 3:15 PM September 10, 2024 3:15 PM

views 10

सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली

राज्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली असून या गावांचा विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल. कोकणात गणेशोत्सवाचं भजन संस्कृतीशी अतूट नातं आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्यावर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्हा पर...

September 10, 2024 3:12 PM September 10, 2024 3:12 PM

views 7

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरीडॉरच्या दुतर्फा ध्वनी रोधक बसवण्याचं काम सुरू

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरीडॉरच्या दुतर्फा ध्वनी रोधक बसवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत ८७ किलोमीटर अंतरापर्यंत ध्वनीरोधक बसवले गेले आहेत. यात १ लाख ७५ हजार ध्वनीरोधक गुजरातमध्ये बसवण्यात आले आहेत. ध्वनीरोधकांच्या निर्मितीसाठी सुरत, आनंद आणि अहमदाबादमध्ये तीन कारखाने उभारण्यात आले आहेत. ट्रेनम...

September 10, 2024 12:55 PM September 10, 2024 12:55 PM

views 10

प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं आवाहन

मृत्यूनंतर केलेलं अवयवदान हे अनेकांसाठी जीवदान ठरू शकतं, त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असं आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या अवयवदान जनजागृती सोहळ्यात ते बोलत होते. अकोला जिल्ह्यात...

September 10, 2024 3:26 PM September 10, 2024 3:26 PM

views 8

अकोला जिल्ह्यातील १ हजार ८२५ शाळांमध्ये सखी सावित्री समित्या स्थापन

शालेय विद्यार्थ्यांच्या  सुरक्षिततेच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यातल्या १ हजार ८२५ शाळांमध्ये गेल्या ६ तारखेपर्यंत सखी सावित्री समित्या स्थापन करण्यात आल्या असून शाळा स्तरावर या समित्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूम...

September 10, 2024 9:40 AM September 10, 2024 9:40 AM

views 9

मुंबई, ठाणे आणि पालघरमधून अडीच लाखांहून जास्त चाकरमाने एसटीने कोकणात दाखल

यावर्षी गणपती उत्सवासाठी गेल्या पाच दिवसांत, मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांहून जास्त चाकरमाने एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात रवाना झाले आहेत. 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळात झालेला एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब अशा अडचणींवर मात करत एसटी ...

September 10, 2024 9:20 AM September 10, 2024 9:20 AM

views 3

घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन

गणेशोत्सवात आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.