प्रादेशिक बातम्या

September 11, 2024 7:29 PM September 11, 2024 7:29 PM

views 12

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची नियुक्ती केली आहे.  या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेत आज सामंजस्‍य करार...

September 11, 2024 7:01 PM September 11, 2024 7:01 PM

views 13

सोयाबीन, कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसंच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल

सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली.   विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज...

September 11, 2024 6:14 PM September 11, 2024 6:14 PM

views 17

राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धुलाई आणि चकाकी भत्त्यात वाढ

राष्ट्रीय छात्र सेना योजनेसाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धुलाई आणि चकाकी भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. माध्यमिक,उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या योजनेत सहभागी होत असतात. या सेनेच्या कनिष्ठ विभागातल्या छात्र सैनिकांना ८ महिन्यांसाठी आणि वरिष्ठ विभागातल्या छात्र सैनिकांना ६ महिन्यां...

September 11, 2024 6:06 PM September 11, 2024 6:06 PM

views 8

लातूर शहरात भूकंपाची नोंद नाही

लातूर शहरातल्या विवेकानंद चौक परिसरात आज सकाळी भूगर्भातून आवाज झाला. त्यामुळे शहराला भूकंपाचा धक्का झाल्याची चर्चा होऊ लागली. जिल्हा प्रशासनानं यासंदर्भात नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडे चौकशी केली. मात्र भूकंप मापन केंद्रात भूकंपाची कसलीही नोंद झाली नसल्याचं समजलं. नागरिकांनी घाबर...

September 11, 2024 6:04 PM September 11, 2024 6:04 PM

views 12

पालघरमध्ये ग्रामीण भागात आदिवासी कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त

पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायातील कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त ठरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. किमान या अभियानाच्या माध्यमातून का होईना पण ग्रामीण आणि शहरी भागातल्या माता आणि बालकं आता पोषक आहार घेऊ लागले आहेत.  वळणपाडा अंगणवाडीच्या माध्यमातून या भागातल्या ...

September 11, 2024 3:37 PM September 11, 2024 3:37 PM

views 9

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशाभरातल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनानं देशाभरातल्या  तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत राज्यातून  पहिली रेल्वेगाडी  अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वेगाडी  नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून, यासाठी आवश्यक ती सर...

September 11, 2024 3:50 PM September 11, 2024 3:50 PM

views 14

मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला.     मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन १४० अब्ज डॉलर इतक...

September 11, 2024 3:31 PM September 11, 2024 3:31 PM

views 13

लातूर पालिकेतर्फे शहरात घनकचरा व्यवस्थापन

लातूर शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या जन-आधार सेवाभावी संस्थेचं कंत्राट संपल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया लातूर महानगरपालिका प्रशासनानं सुरू केली आहे. दरम्यान, महानगरप...

September 11, 2024 3:20 PM September 11, 2024 3:20 PM

views 3

भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस

भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून  नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनानं  शाळा-महाविद्यालयाला सुट्टी दिली आहे. वैनगंगा नदीला पूर आला असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन आठ किलोमिटर पर्यंत पुराच्या पाण्यात वाहून गेली होती...

September 11, 2024 3:17 PM September 11, 2024 3:17 PM

views 19

चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने चार ठार, एक जखमी

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातल्या गणेशपुर इथं विजेचा धक्का बसून चार जण ठार तर एक शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी युवकावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ही घटना वन्य प्राण्यांपासून शेत-पिकाचं रक्षण करण्यासाठी लावलेल्या तारांच्या कुंपणामुळं घडल्याचा प्राथम...