प्रादेशिक बातम्या

October 22, 2025 7:37 PM October 22, 2025 7:37 PM

views 20

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या तसंच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला.   अमरावतीमधल्या भारतीय जनसंचार संस्थेची बडनेरा इथली इमारत ...

October 22, 2025 3:07 PM October 22, 2025 3:07 PM

views 27

बीडमध्ये ५० हजार घरकुले विक्रमी वेळेत पूर्ण

ऐन दिवाळीत बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत ५० हजार घरकुले राज्य सरकारच्या वतीने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली. त्यामुळं बीड वासियांची दिवाळी नवीन घरकुलात साजरी होणार आहे. या योजनेसाठी शासनाकडून ९९० कोटीं रूपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख...

October 22, 2025 3:00 PM October 22, 2025 3:00 PM

views 54

राज्यात पुन्हा पाऊस बरसणार, ‘येलो अलर्ट’ जारी

मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागासाठी हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता...

October 21, 2025 3:07 PM October 21, 2025 3:07 PM

views 54

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे  नुकसानी  झालेल्या  शेतकऱ्यांना आता ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे. याकरता  विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.या बा...

October 21, 2025 3:27 PM October 21, 2025 3:27 PM

views 55

देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल

दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे. वाशी इथल्या बाजारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड इथल्या पडवणे गावचे आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतले हे आंबे आहेत. आज हे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून त्याला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे.

October 20, 2025 7:48 PM October 20, 2025 7:48 PM

views 33

आदि कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार

 आदि कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत  आज पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे पालघर जिल्ह्यातल्या  आदि कर्मयोगी, आदि सहयोगी तसंच आदि साथी यांनी केलेल्या अथक परिश्रमांचं फळ आहे. हा सन्मान पालघर जिल...

October 20, 2025 7:43 PM October 20, 2025 7:43 PM

views 54

विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विकसित महाराष्ट्र २०४७ सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता दिली गेली. आता हा मसुदा मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.  या मसुद्याअंतर्गत २०२९, २०३५ आणि २०४७ पर्यंत अशा तीन टप्प्यात विकसित महाराष...

October 20, 2025 7:06 PM October 20, 2025 7:06 PM

views 26

फटाक्यांची आतषबाजी करताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं महावितरणचं आवाहन

दिवाळीचा आनंद साजरा करताना विजेची रोषणाई तसंच फटाक्यांची आतषबाजी करताना सुरक्षिततेला प्राधान्य देणं आवश्यक असून  सार्वजनिक वीज यंत्रणेबरोबरच घरगुती रोषणाईच्या उपकरणांपासून सावध राहावं असं आवाहन महावितरणने केलं आहे. घरगुती विद्युत उपकरणांमधे दर्जेदार उत्पादनं वापरावीत, विजेवर चालणाऱ्या रोषणाईच्या उपक...

October 20, 2025 7:04 PM October 20, 2025 7:04 PM

views 49

आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी राज्यात ‘वॉर रूम’ची स्थापना

राज्यातल्या विविध आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली  प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने शासन वॉर रूम स्थापन करणार आहे. हा विशेष कक्ष मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली काम करणार असून अध्यक्षपदी सेवानिवृत्त आयए एस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली आ...

October 20, 2025 3:01 PM October 20, 2025 3:01 PM

views 51

कोकण रेल्वेच्या ४ गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीला थांबा

रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या ४ गाड्यांपैकी २ गाड्यांना  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग इथं तर २ गाड्यांना कणकवली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. याबाबत रेल्वे बोर्डानं परिपत्रकही जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार एर्नाकुलम - हजरत ...