प्रादेशिक बातम्या

October 20, 2025 2:59 PM October 20, 2025 2:59 PM

views 157

राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं निधन

राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं आज गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली होती. आमगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले होते, तसंच चिमूर मतदारसंघातून एकदा ल...

October 20, 2025 1:30 PM October 20, 2025 1:30 PM

views 25

दक्षिण मुंबईच्या कफ परेडमध्ये चाळीला लागलेल्या आगीत १५ वर्षीय युवकाचा मृत्यू

दक्षिण मुंबईच्या कफ परेड भागातल्या एका चाळीला आज लागलेल्या आगीत एका १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं. तर, वरळीच्या महाकाली नगरमध्ये काल रात्री लागलेल्या आगीचा फटका ७ ते ८ झोपड्यांना बसला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहा...

October 20, 2025 3:07 PM October 20, 2025 3:07 PM

views 64

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर झाला आहे. यामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळं बाधित झालेल्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी १ हजार ५६६ कोटी ४० लाख रुपये निधी महाराष्ट्राला ...

October 19, 2025 8:26 PM October 19, 2025 8:26 PM

views 15

मतदार यादीतल्या त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मोर्चा

मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा काढण्यात येणार  आहे. खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मतदार यादीतल्या त्रुटीकडे विरोधी पक्ष निवडणूक आयोगाचं सातत्याने लक्ष वेधत आहे. मात्र निवडणूक आयोग विरोधकांच्य...

October 19, 2025 3:14 PM October 19, 2025 3:14 PM

views 50

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई-बग्गी सेवेला प्रारंभ

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई- बग्गी सेवेला आज प्रारंभ  झाला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दूरस्थ पद्धतीने याचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल, आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले. ही ई-बग्गी संजय गांधी राष्ट्री...

October 19, 2025 10:09 AM October 19, 2025 10:09 AM

views 115

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी

यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि क...

October 18, 2025 7:18 PM October 18, 2025 7:18 PM

views 25

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा

महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण म्हणजे अंधःकारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक आहे असं सांगून स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी शुभेच्छा संदेशातून केलं आहे...

October 19, 2025 9:50 AM October 19, 2025 9:50 AM

views 98

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी

यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि क...

October 18, 2025 7:34 PM October 18, 2025 7:34 PM

views 99

शालेय शिष्यवृत्ती परीक्षांबाबत मोठा निर्णय!

शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतल्या जाणार आहेत. राज्य सरकारनं या निर्णयाला काल मान्यता दिली. सध्या या परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतल्या जातात. चालू शैक्षणिक वर्षात ठरलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा होतील. त्या...

October 18, 2025 5:45 PM October 18, 2025 5:45 PM

views 27

राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियान

अन्न आणि औषध प्रशासनामार्फत राज्यात 'सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा' हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत असून याअंतर्गत १२ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार ४५८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे एकंदर ४ हजार ६७६ नमुने तपासण्यात आले आणि अनियमितता आढळलेल्या १ हजा...