प्रादेशिक बातम्या

October 18, 2025 8:07 PM October 18, 2025 8:07 PM

views 56

नंदूरबार इथं रस्ते अपघातात ८ जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा यात्रेवरून परतत असलेल्या भाविकांची गाडी चांदशैली घाटात दरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला घाटातल्या वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. तळोदा उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी ...

October 18, 2025 3:10 PM October 18, 2025 3:10 PM

views 48

बीडमध्ये जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपोषण

आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमातींना जात प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी आज उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माजलगाव आणि बीडचे जिल्हाधिकारी...

October 18, 2025 3:13 PM October 18, 2025 3:13 PM

views 83

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना दंड

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबाग जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच एक वर्षाचं चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र लिहून देण्याचा आदेश दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या हर्षद कशाळकर या पत्रकाराला ...

October 18, 2025 3:12 PM October 18, 2025 3:12 PM

views 67

अहिल्यानगर जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नूकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रूपयांची मदत महायुती सरकारनं जाहीर केल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना प्रशासन...

October 18, 2025 3:23 PM October 18, 2025 3:23 PM

views 46

यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ

यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील परसोडी खुर्द इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ घेतली. मोठ्या आवाजाच्या फटाक्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडतं तसंच मानवासह पशुपक्ष्यांवर त्याचे विपरीत परिणाम होतात, याबाबत शिक्षकांनी माहिती देऊन विद्यार्थ्य...

October 18, 2025 2:48 PM October 18, 2025 2:48 PM

views 36

धुळे पोलिसांची दिवाळी सणानिमित्त विशेष मोहिम

धुळे शहरात दिवाळी सणामुळे वाढलेली गर्दी, वाहतुकीची कोंडी तसंच विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी धुळे पोलीस दलानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गस्त वाढवली आहे. शहरात शांतता आणि आनंदी वातावरण राखण्यासाठी नागरिकांनी जबाबदार वर्तन करावं असं आवाहन पोलिसांनी ...

October 18, 2025 2:27 PM October 18, 2025 2:27 PM

views 39

महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अ‍ॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला

महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अ‍ॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला आहे. आयएनएस कुंजली इथं काल झालेल्या समारंभात रिअर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी यांच्याकडून झा यांनी पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले शंतनू झा यांची १ जुलै १९९३ रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झाली. आय एन एस विक्रमादि...

October 18, 2025 11:25 AM October 18, 2025 11:25 AM

views 32

डिजिटल अटकेचा बहाणा करून व्यावसायिकाचे ५८ कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक

डिजिटल अटकेचा बहाणा करून मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे ५८कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 'डिजिटल अटक' या सायबर गुन्ह्याबाबत गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक म...

October 17, 2025 8:32 PM October 17, 2025 8:32 PM

views 88

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांना मदत जारी

गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी एक हजार 356 कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.  सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्हांमधल्या २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१...

October 17, 2025 8:29 PM October 17, 2025 8:29 PM

views 41

पहिल्या ‘तेजस’ विमानाचं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकापर्ण

नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालं. या विमानानं यावेळी आकाशात उड्डाण केलं. ओझरमधल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी तेजस एमके वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं. भा...