प्रादेशिक बातम्या

November 27, 2024 7:55 PM November 27, 2024 7:55 PM

views 8

गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट

राज्यात गारठा वाढला असून गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं ९ पुर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं.   नाशिकमध्ये १० पूर्णां...

November 27, 2024 7:53 PM November 27, 2024 7:53 PM

views 11

यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवणार

यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासंदर्भात नुकतीच दिल्लीत बैठक झाली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्ल्लीकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी आपण ...

November 27, 2024 7:45 PM November 27, 2024 7:45 PM

views 29

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर केले. गावकऱ्यांनी बालविवाह होणार नाही अशी सामुहिक प्रतिज्ञा ग्रामसभांमध्ये घेतली. या ग्रामसभांमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, आशा स्वयंसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील, गावातील राजकीय, सामाजिक पदाधि...

November 27, 2024 8:26 PM November 27, 2024 8:26 PM

views 7

राज्यात सत्तास्थापनेबाबत अद्याप निर्णयाची प्रतीक्षा, मुख्यमंत्री आज भूमिका स्पष्ट करणार

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही ...

November 27, 2024 4:55 PM November 27, 2024 4:55 PM

views 1

वाशीम जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प मंगळूरपीर तालुक्यात हिसाई इथं कार्यान्वित

मुख्यमंत्री सौर कृषी योजना २ अंतर्गत वाशीम जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प मंगळूरपीर तालुक्यात हिसाई इथं कार्यान्वित झाला. या प्रकल्पाची क्षमता चार मेगावॅट असून हा अकोला परिमंडळातला तिसरा प्रकल्प आहे. वीस एकर शासकीय जमिनीवर उभारलेला हा प्रकल्प ३३ केव्ही शेलू उपकेंद्राशी जोडलेला आहे. त्यामुळे ३३ केव्ही...

November 27, 2024 4:31 PM November 27, 2024 4:31 PM

views 2

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जमा केलेली गुरे न्यायालयाचा आदेश मिळालेला नसतानाही गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट हमीपत्र करुन विकली. या प्रकरणात ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांची विक्री झाली. लाखनी पोलिसांनी पाचही गोशाळांच्या एकूण ३३ जण...

November 26, 2024 7:20 PM November 26, 2024 7:20 PM

views 9

केंद्र सरकार ग्रामीण भागात १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारणार

केंद्र सरकारच्या सहकार से समृद्धी या योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारले जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड तसचं राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम असून तो राज्यातल्य प्रत्येक जिल्ह्यात राबवला जा...

November 26, 2024 7:17 PM November 26, 2024 7:17 PM

views 7

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या भुयारी मार्गावर व्हेंटिलेशन प्रणाली बसवली जाणार

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेशन प्रणाली बसवली जाणार आहे. यात ९ जेट पंखे आणि अधिक क्षमतेचे मध्यवर्ती पंके बसवले जाणार आहेत. या प्रणालीची मदत आगीसारख्या घटना घडल्यावरही होणार आहे. भुयारात आग लागल्यावर मध्यवर्ती पंखे अधिक वेगानं फिरतील आण...

November 26, 2024 7:15 PM November 26, 2024 7:15 PM

views 12

मुंबईत, लोअर परळ परिसरातल्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबईत, लोअर परळ परिसरातल्या १ हजार ४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम २८ नोव्हेंबर रात्री दहा वाजल्यापासून ते २९ नोव्हेंबर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातल्या लोअर परळ, करीरोड, प्रभादेवी, सेनापती बापट मार्ग या ...

November 26, 2024 8:02 PM November 26, 2024 8:02 PM

views 5

महाराष्ट्रात सरकारस्थापनेची अद्याप प्रतिक्षा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे, मंत्री ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.