प्रादेशिक बातम्या

December 1, 2024 7:15 PM December 1, 2024 7:15 PM

views 11

राज्यात येत्या 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार

महायुतीमध्ये कसलाही वाद नाही असं सांगत महाराष्ट्रात  येत्या गुरुवारी 5 डिसेंबर ला शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपमुख्यमंत्री बनतील असं त्यांनी काल स्पष्ट ...

December 1, 2024 7:05 PM December 1, 2024 7:05 PM

views 24

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली फेरमतदानाची मागणी फेटाळली

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवली गेली असं सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची फेरमतदानाची मागणी फेटाळली आहे. मारकडवाडीतल्या ग्रामपंचायतीने मतदान प्रक्रियेची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा फेरमतदानाच्या मागणीचा ठराव निवडणूक निर्...

December 1, 2024 5:03 PM December 1, 2024 5:03 PM

views 26

ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तिविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने...

December 1, 2024 10:47 AM December 1, 2024 10:47 AM

views 6

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचं 25 टक्के काम पूर्ण

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचं 25 टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून एकंदर लहान-मोठे असे 50 पूल या मार्गावर असणार आहेत. त्यापैकी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर 106 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. सोलापूर-तुळजापूर-धार...

December 1, 2024 10:27 AM December 1, 2024 10:27 AM

views 14

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील बिबवेवाड़ी इथं झालं. भगवान महावीर आणि जैन धर्मातील अन्य तीर्थंकरानी सांगितल्याप्रमाणे आपण घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर द्यायला हवा असं प्रतिपादन त्यांनी केलं. जैन समाजातील व्यक्ति कमाईपेक्ष...

December 1, 2024 9:58 AM December 1, 2024 9:58 AM

views 8

साप चावण्याच्या सर्व घटनांची नोंद करण्याची केंद्राची सर्व राज्यांना सूचना

सर्पदंश आणि सर्पदंशामुळे होणारे  मृत्यू यांना राज्य सार्वजनिक आरोग्य कायद्यातल्या तरतुदीनुसार नोटिफायबल डिसीज म्हणजेच आजारांच्या अधिसूचिमध्ये समाविष्ट करावं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना, सांगितलं आहे. विशेषतः शेतकरी आणि आदिवासींमध्ये सर्पदंशामुळे मृत्य...

November 30, 2024 7:43 PM November 30, 2024 7:43 PM

views 13

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी २६ आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या सर्व २६ आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आत्तापर्यंत मुख्य शूटर शिव कुमार गौतम सह एकूण २६ आरोपींना अटक केलेली असून या प्रकरणी अद्याप पुढील तपास सुरु आहे. मकोका अ...

November 30, 2024 7:36 PM November 30, 2024 7:36 PM

views 7

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाची सांगता

विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात सुरु केलेल्या आत्मक्लेश उपोषणाची आज सांगता झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण  सुरू झालं होतं. महाय...

November 30, 2024 7:20 PM November 30, 2024 7:20 PM

views 12

मुख्यमंत्री भाजपचा, उपमुख्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे – अजित पवार

महायुती सरकारचा शपविधी ५ डिसेंबरला होणार असून मुख्यमंत्री भाजपचा होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील असं पवार म्हणाले. विरोधकांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याचं खापर मतदान यंत्राव...

November 30, 2024 7:08 PM November 30, 2024 7:08 PM

views 9

एनसीसीमध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबईत के सी महाविद्यालयात ‘एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावरच्या चर्चासत्रचं उद्घाटन झालं. या सत्रात त्यांनी योग आणि ध्यानधारणेचं महत्त्व विशद करत एनसीसी मध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. यामुळे मुलींचा आत्मविश्व...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.