प्रादेशिक बातम्या

December 2, 2024 7:12 PM December 2, 2024 7:12 PM

views 5

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. भोपाळमधे झालेल्या युनियन कार्बाईड विषारी वायू दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून पाळला जातो. ही दुर्घटना ३ डिसेंबर १९८४ रोजी घडली होती.

December 2, 2024 7:00 PM December 2, 2024 7:00 PM

views 118

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ९ फेब्रुवारी या एकाच दिवशी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या क...

December 2, 2024 6:57 PM December 2, 2024 6:57 PM

views 14

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचं आगमन

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे. दरवर्षी थंडीचा हंगाम सुरु झाल्यावर युरोपातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून २ ते ३ महिने हे पक्षी मुक्कामी येतात. मालवण दांडी, देवबाग, भोगवे आदी समुद्रकिनारे या पक्षांच्या वावरामुळे गजबजून गेले आहेत. ही पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे. समु...

December 2, 2024 6:55 PM December 2, 2024 6:55 PM

views 6

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानंतर ५२७ इमारती धोकादायक

नवी मुंबई महानगरपालिकेनं २०२४-२५ या वर्षासाठी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणानंतर ५२७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या आहेत. या इमारतींचा वापर तात्काळ थांबवण्यात यावा असं आवाहन पालिकेनं केलं आहे. तसंच ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या इमारतींचं संरचना परिक्षण महानगरपा...

December 2, 2024 6:46 PM December 2, 2024 6:46 PM

views 18

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातल्या मतदानात तफावत

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातलं मतदान यात तफावत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत  बोलत होते.    यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी उदाहर...

December 2, 2024 7:51 PM December 2, 2024 7:51 PM

views 7

येत्या बुधवारी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक

राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने महायुतीच्या घटक पक्षांमधे आजपासून वाटाघाटी पुन्हा सुरु होतील. भाजपा विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाच्या संसदीय मंडळानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. उद्या रात्री या द...

December 2, 2024 1:45 PM December 2, 2024 1:45 PM

views 15

ईव्हीएममध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्यांवर कठोर कारवाई – मुख्य निवडणूक अधिकारी

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोकलिंगम यांनी दिला आहे. ईव्हीएम गैरव्यवहारांबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीच्या...

December 1, 2024 7:13 PM December 1, 2024 7:13 PM

views 14

अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन

अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन आज साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते झालं. महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या प्रबोधन युगाचे पितामह असून त्यांच्या विचारातूूनच लोकशाहीचा पाया घातला गेला असं कानडे यावेळी म्हणाले. उत्तमराव पाटील हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. यावेळी दिशा...

December 1, 2024 7:07 PM December 1, 2024 7:07 PM

views 13

रब्बी हंगामात ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शासनाकडून उपलब्ध करून दिलं आहे. भविष्यात संपूर्ण राज्यात पीक पाहणी ही पूर्णपणे सुधारित ‘ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप’द्वारे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी या ॲपद्वारे ठराविक मुदत...

December 1, 2024 7:05 PM December 1, 2024 7:05 PM

views 2

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. तसंच पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.