प्रादेशिक बातम्या

January 16, 2025 9:40 AM January 16, 2025 9:40 AM

views 3

अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केलं – सई परांजपे

अजिंठा - वेरुळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिने साक्षर केल्याचं ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात ...

January 15, 2025 8:41 PM January 15, 2025 8:41 PM

views 22

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग ६व्या वर्षी मुंबई विद्यापिठाला विजेतेपद

१७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग सहाव्या वर्षी मुंबई विद्यापिठानं विजेतेपद पटकावलं आहे. लोणेरेमधल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात १२ जानेवारीपासून आयोजित या स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं ९२ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठानं १३ सुवर...

January 15, 2025 7:21 PM January 15, 2025 7:21 PM

views 13

सोलापूर इथं गड्डा यात्रेत जनावरांचा बाजार

सोलापूर इथल्या गड्डा यात्रेत जनावराच्या बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात मुऱ्हा, म्हैसाणा म्हैस, खिलार खोंड, गाय, कालवड, गिर गाय होस्टन, जर्सी गाय विक्रीसाठी आणण्यात आली आहेत. पंढरपुरी म्हशीला कोल्हापूर,  बेळगाव, हुबळी, धारवाड इथल्या शेतकऱ्यांची तर मुऱ्हा म्हशीला तेलंगणा, आंध्रप्रदेशातल्या शेतक...

January 15, 2025 6:52 PM January 15, 2025 6:52 PM

views 3

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं निधन

मुंबईतले ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईत भूदान यज्ञ समिती, मुंबई सर्वोदय मंडळाची स्थापना झाल्यानंतर सुरवातीच्या काळात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी रघुनाथ तळवलकर एक होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी पुष्पाताई यांनी दादर, कुर्ल...

January 15, 2025 6:47 PM January 15, 2025 6:47 PM

views 9

संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला न्यायालयानं २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. सुनावणीनंतर कराडला न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कराड समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे पो...

January 15, 2025 7:05 PM January 15, 2025 7:05 PM

views 17

नौदलाच्या २ नौका आणि एका पाणबुडीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण

भारत विस्तारवाद नाही, तर विकासवादाच्या दिशेनं काम करत आहे. भारतानं खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध भारत-प्रशांत क्षेत्राचं नेहमीच समर्थन केलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ते आज मुंबईत नौदलाच्या गोदीत सुरत आणि नीलगिरी या युद्धनौका, तसंच वाघशीर ही पाणबुडी नौदलाच्य...

January 15, 2025 7:05 PM January 15, 2025 7:05 PM

views 12

अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा गाभा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी मुंबईतल्या खारघर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. भारत समजून घेण्यासाठी आधी हे अध्यात्म आपल्या आत रुजवायला हवं, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. मानवतेची सेवा हे या अध्यात्मिक संस्कृतीचं मूळ आह...

January 15, 2025 3:53 PM January 15, 2025 3:53 PM

views 6

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार

विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राला गौरवण्यात आलं आहे. ऐरोलीच्या या केंद्राला देशातलं सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र आणि ओपन ऍक्सेस या दोन राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात ...

January 15, 2025 3:42 PM January 15, 2025 3:42 PM

views 4

आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला सुवर्णपदक

चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात ९ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठानं सुवर्णपदक पटकावलं आहे. ५० मीटर थ्री पोझिशन रायफल नेमबाजीत पुरुष गटात रुद्रांक्ष पाटील याने आपल्या उत्कृष्ट नेमबाजीच्या जोरावर ६०० पैकी ५९३ गुण मिळवत सुवर्णपद...

January 15, 2025 3:59 PM January 15, 2025 3:59 PM

views 7

परळीत व्यापाऱ्यांनी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ आजपासून पुकारला बेमुदत संप

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये कटकारस्थान रचण्याच्या आरोपाखाली वाल्मीक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचं वृत्त आहे. परळी शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून बाजारप...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.