प्रादेशिक बातम्या

February 11, 2025 7:35 PM February 11, 2025 7:35 PM

views 9

‘वेव्ह्ज २०२५’ परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेच्या धर्तीवर वेव्ह्ज २०२५ ही परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतरांशी मुंबईत मंत्रालयात आज यासंदर्भात झ...

February 11, 2025 7:26 PM February 11, 2025 7:26 PM

views 15

राज्यात जीबीएसच्या आणखी एकाचा मृत्यू

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात काल 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात या आजाराने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएस रुग्णसंख्या 192 झाली आहे.

February 11, 2025 7:58 PM February 11, 2025 7:58 PM

views 12

SSC-HSC परीक्षेत सामूहिक कॉपी होणाऱ्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द

दहावी-बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. तसंच कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश ही त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांनी राज्यातल...

February 11, 2025 7:58 PM February 11, 2025 7:58 PM

views 14

सोन्याचे दर घसरले, चांदी लाखाच्या उंबरठ्यावर

सोन्याचे दर मात्र काहीसे घसरले. आज २४ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे ८७ हजार ७७० रुपये इतका होता. २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर तोळ्यामागे ८५ हजार ५० रुपये इतका होता.  चांदीचे दर आज आणखी दोन हजार रुपयांची भर पडली. चांदीचा आजचा दर किलोमागे ९९ हजार ४०० रुपये इतका होता.

February 11, 2025 7:11 PM February 11, 2025 7:11 PM

views 8

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार असून पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत बांद्रा-कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प असून ...

February 11, 2025 3:35 PM February 11, 2025 3:35 PM

views 14

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागाकडून स्पष्ट

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आधी १३ जानेवारीपर्यंत मुदत होती; ती संपल्यानंतर केंद्र शासनाने २४ दिवसांची म्हणजे दिनांक ६ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र महाराष्ट्रात सोयाबी...

February 11, 2025 9:03 PM February 11, 2025 9:03 PM

views 9

प्रसारभारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कामकाजाचा आढावा

प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज मुंबईत दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व विभागांची माहिती जाणून घेतली आणि अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी विभागप्रमुखांना सूचना दिल्या. मे महिन्यात १ ते ४ तारखेदरम्यान होणाऱ्या waves परिषदेच्या तयारीचाही आढ...

February 11, 2025 3:18 PM February 11, 2025 3:18 PM

views 69

राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेत एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार

येत्या आर्थिक वर्षापासून दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भातला शासन आदेश काल जारी झाला. या निधीच्या योग्य विनियोग होण्यासाठी सुस्पष्ट आदेश लवकरच नियोजन विभाग, वित्त विभागाच्या म...

February 11, 2025 3:08 PM February 11, 2025 3:08 PM

views 5

ओशिवरा इथल्या फर्निचर बाजाराला आग लागल्याने १० दुकानं जळून खाक

ओशिवरा इथल्या फर्निचर बाजाराला आज सकाळी आग लागल्याने १० दुकानं जळून खाक झाली. जोगेश्वरी पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावरच्या या बाजारातल्या लाकडी सामानाच्या गोदामाला सकाळी साडे अकराच्या सुमाराला आग लागली. अग्निशमन दलाच्या २० गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसू...

February 11, 2025 2:30 PM February 11, 2025 2:30 PM

views 3

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

महाराष्ट्रात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली. या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. राज्यभरात ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.