प्रादेशिक बातम्या

February 13, 2025 3:52 PM February 13, 2025 3:52 PM

views 13

गरजूंना हक्काचं घर मिळण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज – प्रधानमंत्री आवास योजना

शहरी भागातल्या गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं, यासाठी सर्वांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची गरज आहे, असं आवाहन प्रधानमंत्री आवास योजना २चे अभियान संचालक अजित कवडे यांनी केलं. मुंबईत आज या योजनेसंदर्भात कोकण विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. ...

February 13, 2025 3:25 PM February 13, 2025 3:25 PM

views 1

YES Bank Case : DHFLचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना जामीन मंजूर

येस बँक मनी लाँडरिंग प्रकरणी DHFL चे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. आरोपी प्रदीर्घ काळ तुरुंगात आहेत, तसंच या प्रकरणाची सुनावणी लवकर सुरु होण्याची शक्यता नाही. या गोष्टी लक्षात घेता, न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल पिठानं काल दोन्ही आरोपींना प्रत्...

February 13, 2025 3:21 PM February 13, 2025 3:21 PM

views 6

गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानावर जाताना शिपायाचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातल्या एका पोलीस शिपायाचा नक्षलविरोधी अभियानावर जाताना हृदयविकाराच्या झटक्यानं काल मृत्यू झाला. रवीश मधुमटके हे काल संध्याकाळी भामरागड तालुक्यातल्या नक्षलवादी मोहीमेवर निघाले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना ...

February 13, 2025 3:15 PM February 13, 2025 3:15 PM

views 7

आदित्य ठाकरेंनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे यांनी काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या दोघांमध्ये निवडणूक आयोगावर ईव्हीएम संदर्...

February 13, 2025 4:01 PM February 13, 2025 4:01 PM

views 4

महिला आणि बालविकास विभागात १८,८८२ पदांची भरती

महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ मदतनीस अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ आणि अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नां...

February 13, 2025 4:02 PM February 13, 2025 4:02 PM

views 18

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्यावतीनं ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना डॉ. वासुदेव रायते स्मृती पुरस्कार तर श्यामची आई चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनेते माधव वझे यांना श्रीनिवास विष्णू रायते गुरुजी बालसाहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १६ तारखेला पुणे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्...

February 13, 2025 3:39 PM February 13, 2025 3:39 PM

views 20

ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल रात्री प्रदीर्घ आजारानं मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’, ‘मर्मबंधातली ठेव, नभ मेघांनी आक्रमिले’, ‘वक्रतुंड महाकाय’ ही त्यांची काह...

February 11, 2025 8:25 PM February 11, 2025 8:25 PM

views 6

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद

गडचिरोली जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात नक्षलवाद्यांनी छावणी उभारल्याची माहिती मिळाल्यानंतर सी-६० पथकाच्या १८ आणि जलद प्रतिसाद पथकाच्या २ तुकड्यांनी काल त्या भागात नक्षलविरोधी अभियान सुरु केलं होतं. या अभियानादर...

February 11, 2025 7:49 PM February 11, 2025 7:49 PM

views 3

पालघर जिल्ह्यातल्या देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता

पालघर जिल्ह्यातल्या देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळं चाळीस लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. यातून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी ६९ दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त आरक्षित असणार आहे.  &nbs...

February 11, 2025 7:42 PM February 11, 2025 7:42 PM

views 9

मुंबईत मागासवर्गीयांची घरे नियमबाह्य पद्धतीने तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुंबईत पवईतल्या जयभीम नगर इथली मागासवर्गीयांची घरे नियमबाह्य पद्धतीने तोडणारे अधिकारी आणि बिल्डरवर गुन्हा दाखल झाला आहे. गेल्यावर्षी ही घरं पाडताना लहान मुलं, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार या कुटुंबांनी केली होती. त्यानंतर एका पिडीतेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.