February 23, 2025 3:23 PM February 23, 2025 3:23 PM
9
अकोल्यात पाणलोट विकास यात्रेला आजपासून सुरुवात
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. पाणलोट व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठीची ही यात्रा बाळापुर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक आणि बटवाडी खुर्द इथून सुरु झाली. अकोला जिल्ह्यातल्या बारा गावांमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येईल.