प्रादेशिक बातम्या

February 26, 2025 1:22 PM February 26, 2025 1:22 PM

views 3

बदलापूर लैंगिक प्रकरण : आरोपीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी पोलिसांना अंशतः दिलासा

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणात सहभागी असलेल्या पाच पोलिसांना अंशतः दिलासा मिळाला आहे. दंडाधिकारी चौकशी अहवालातील काही निष्कर्ष सत्र न्यायालयानं तात्पुरते स्थगित केले आहेत. दंडाधिकारी अहवालातल्या विशिष्ट निष्कर्षांना स्थगिती दिली असून सीआयडीचा तपास स्वतंत्रपणे ...

February 25, 2025 9:17 PM February 25, 2025 9:17 PM

views 13

गावठाणांमधल्या अपूर्ण नागरी सुविधा पूर्ण करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

राज्यात १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या ३३२ गावठाणांमध्ये अपूर्ण राहिलेल्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या कामांसाठी ५...

February 25, 2025 9:12 PM February 25, 2025 9:12 PM

views 388

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढून ५३ टक्के

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाली. आता राज्य सरकारी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता मिळेल. १ जुलैपासून ही दरवाढ लागू होणार आहे आणि जुलै ते जानेवारी दरम्यानची थकबाकी या महिन्यातल्या वेतनासह दिली जाणार आहे. 

February 25, 2025 9:15 PM February 25, 2025 9:15 PM

views 8

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अग्रस्थानी

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत राज्यात २२ हजार १० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत २० हजार प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. यात सर्वाधिक १ हजार ८९५ प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. त्यानंतर अहिल्यानगर, सांगली या जिल्ह...

February 25, 2025 3:25 PM February 25, 2025 3:25 PM

views 2

मुंबईसह कोकणात उष्णतेची तीव्र लाट

मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमधे पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. 

February 25, 2025 2:52 PM February 25, 2025 2:52 PM

views 4

राज्यात काँग्रेसची सद्भावना यात्रा

राज्यात बंधुभाव आणि सामाजिक सौहार्द वाढीस लागावं यासाठी  काँग्रेसने सद्भावना यात्रेचं आयोजन केल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. ही यात्रा ८ मार्चपासून बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथून सुरू होईल. मुंबईत काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात ते काल वार्ताहरांशी बोलत होते.

February 25, 2025 10:53 AM February 25, 2025 10:53 AM

views 8

राज्यातल्या बाजार समित्या सक्षम करण्याचं पणनमंत्र्यांचं आश्वासन

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातल्या बाजार समित्या सक्षम करण्याचं आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल दिलं. पुण्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले....

February 25, 2025 8:51 AM February 25, 2025 8:51 AM

views 18

महाराष्ट्र AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्य शासन प्रशासकीय कामकाज आणि अर्थव्यवस्थेला गती देत आहे; महाराष्ट्र लवकरच देशाच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व परिषदेत ते काल मुंबईत बोलत ...

February 25, 2025 8:37 AM February 25, 2025 8:37 AM

views 24

नवीन शैक्षणिक वर्षापासून ‘स्कूल बस’साठी नियमावली लागू

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बससाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. परिवहन विभागाच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ही नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील...

February 24, 2025 8:51 PM February 24, 2025 8:51 PM

views 15

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आणखी ३ हजार रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेत राज्य शासनातर्फे ३ हजारांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत मिळणारे ६ हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो कृषी सन्मान योजनेचे ६ हजा...