प्रादेशिक बातम्या

February 22, 2025 3:19 PM February 22, 2025 3:19 PM

views 11

नागपूर पतसंस्थेचं यश लाडकी बहीण योजनेमुळे – अदिती तटकरे

नागपूर इथल्या महिलांनी सुरू केलेल्या सहकारी पतसंस्थेचं यश हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे झालेला सकारात्मक बदल आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे सांगितलं.   ही पतसंस्था तीन हजार महिलांनी एकत्र येऊन स्थापन केली असून ती भक्कमपणे उभी असल्याचं तटकरे म्हणाल्य...

February 22, 2025 8:28 PM February 22, 2025 8:28 PM

views 3

जालन्यात वाळूच्या ढिगाऱ्या खाली दबल्यानं ५ मजूरांचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी इथं आज पहाटेच्या सुमारास पाच मजुरांचा मृत्यू झाला. पासोडी रस्त्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी हे मजूर आले होते आणि पत्र्याची शेड करून राहत होते. अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्पर चालकानं घाईनं टिप्पर रिकामा करताना झोपलेल्या मजुरांना पाहिल...

February 22, 2025 10:32 AM February 22, 2025 10:32 AM

views 6

कर्मचारी भरतीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना- मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कर्मचारी भरतीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायाधीश ए. एस. गडकरी आणि कमल खटा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या मुद्द्यावर स्वेच्छेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना काल या सूचना दिल्या.   केवळ कर्मचा...

February 22, 2025 10:29 AM February 22, 2025 10:29 AM

views 10

न्यु इंडिया बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांना पोलिस कोठडी

न्यु इंडिया सहकारी बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांच्या पोलिस कोठडीत, मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने 28 फेब्रुवारी पर्यन्त वाढ केली आहे.   बँकेत 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा या दोघांवर आरोप आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे...

February 22, 2025 10:02 AM February 22, 2025 10:02 AM

views 5

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अमित शहा यांच्या हस्ते मंजुरी पत्र

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अमित शहा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्र वितरण तसंच राज्यातल्या 10 लाख लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरणदेखील यावेळी करण्यात येईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमु...

February 22, 2025 1:31 PM February 22, 2025 1:31 PM

views 1

मराठी भाषेनं शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं – प्रधानमंत्री

मराठी भाषेनं समाजातल्या शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केलं. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला राजधाधी  दिल्ली मनापासून अभिवादन करते, अस...

February 21, 2025 7:46 PM February 21, 2025 7:46 PM

views 6

कुठल्याही योजना बंद होणार नसल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, किंवा एसटीच्या प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत, कुठल्याही योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. ते नागपूरमध्ये कन्हान  इथं एका जाहीर सभेपूर्वी बातमीदारांशी बोलत होते. ज्या पक्षप्रमुखांनी इमानदार नेत्यांना धक्का देऊन पक्षाबाहेर ...

February 21, 2025 7:38 PM February 21, 2025 7:38 PM

views 4

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.   दरम्यान, पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीने भू...

February 21, 2025 7:48 PM February 21, 2025 7:48 PM

views 11

मैदान भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबईतल्या ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानातल्या भूखंडाच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मैदान भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीतं ते बोलत होते.  क्रीडा विभागामार्फत ही तिन्ही मैदानं...

February 21, 2025 7:28 PM February 21, 2025 7:28 PM

views 11

राज ठाकरेंनी घेतली मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत दोन विषयांवर चर्चा झाल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर माध्यमांना दिली. सध्या मुंबई महानगरपालिका तोट्यात असून तोटा कमी करण्यासाठी मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या विविध कंपन्यांच्या केब...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.