प्रादेशिक बातम्या

February 21, 2025 7:21 PM February 21, 2025 7:21 PM

views 12

सिंधुदुर्गात तीन दिवसीय ठाकर लोककला महोत्सवाचं आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या  पिंगुळी इथं तीन दिवसीय ठाकर लोककला महोत्सव आयोजित केला आहे.  या महोत्सवाचं उदघाटन उद्या सकाळी ११.३० वाजता वाजता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे  यांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सव...

February 21, 2025 7:49 PM February 21, 2025 7:49 PM

views 22

एसटीचं दररोज ३ कोटींचं नुकसान

राज्यातल्या एसटी बस सेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे दररोज ३ कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते धाराशिव इथं बातमीदारांशी बोलत होते. सध्या एसटी महामंडळाला कोणत्याही नवीन सवलतीचा विचार करणं शक्य नाही. आणखी सवलती दि...

February 21, 2025 3:26 PM February 21, 2025 3:26 PM

वेगवेगळ्या भाषांमधल्या नाटकांच्या माध्यमातून होणाऱ्या दृष्टिकोन बदलासाठी नाट्यमहोत्सवाची गरज

वेगवेगळ्या भाषांमधल्या नाटकांच्या माध्यमातून होणाऱ्या दृष्टिकोन बदलासाठी नाट्यमहोत्सवाची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी केलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबईत ते काल ब...

February 21, 2025 3:16 PM February 21, 2025 3:16 PM

views 14

उप-मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या २ संशयितांना अटक

राज्याचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बच्या साह्याने उडवण्याची धमकी देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन संशयितांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी ई-मेलद्वारे दिलेल्या धमकीचे मेसेज गोरेगाव तसंच जे जे मार्ग पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सूत्रा...

February 21, 2025 3:10 PM February 21, 2025 3:10 PM

views 1

छत्रपती संभाजी महाराजांवरचा आक्षेपार्ह मजकूर न काढल्याने ४ संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजी महाराजांवरचा आक्षेपार्ह मजकूर न काढल्याबद्दल महाराष्ट्र सायबर विभागाने विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   विकिपीडियाचं संपादन करणाऱ्या  कॅलिफोर्निया इथल्या विकिमीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून मजकूर काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती.   नोटीस पाठवू...

February 21, 2025 3:07 PM February 21, 2025 3:07 PM

views 13

मुंबई उच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या स्थायी नियुक्तीला न्यायवृदांची मंजुरी

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृदांने मुंबई उच्च न्यायालयामधल्या तीन अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या न्यायवृंदाच्या बैठकीत हा निर्णय झाला.   शैलेश ब्रह्मे, फिरदौश पुनावाला आणि जितेंद्र शांतिलाल ...

February 21, 2025 3:05 PM February 21, 2025 3:05 PM

views 6

९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन

  नवी दिल्लीत आजपासून ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा, ७१ वर्षानंतर हे संमेलन नवी दिल्लीत होतंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच संमेलन आहे. त्यानिमित्त सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यात विविध साहित्यिक, ...

February 21, 2025 3:03 PM February 21, 2025 3:03 PM

views 14

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या ५ हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून १६ लाख ११ हजार ६१०विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वा...

February 21, 2025 1:18 PM February 21, 2025 1:18 PM

views 6

शास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकाचा ‘वुमन ऑफ द इयर’ सन्मान

भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकाने “वुमन ऑफ द इयर” म्हणून सन्मानित केलं आहे. या यादीत स्थान मिळवणाऱ्या पूर्णिमा देवी या एकमेव भारतीय महिला आहेत. आसाममध्ये दुर्मिळ होत असलेल्या हरगिला म्हणजेच मोठा करकोचा या पक्षाच्या संरक्षणासाठी त्या प्रयत्न करत आहेत.   जगात अतिशय...

February 20, 2025 8:03 PM February 20, 2025 8:03 PM

views 17

२३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप

गेला आठवडाभर सुरू असलेल्या २३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होत आहे. "द रूम नेक्स्ट डोअर" या चित्रपटानं महोत्सवाची सांगता होईल. सांगता समारंभात प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आणि संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.