प्रादेशिक बातम्या

May 1, 2025 7:36 PM May 1, 2025 7:36 PM

views 9

गेल्या चोवीस तासात राज्यात ठिकठिकाणी तापमानात वाढ

गेल्या चोवीस तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.    राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं ४५ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.   येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

May 1, 2025 7:35 PM May 1, 2025 7:35 PM

views 2

आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्त जळगाव जिल्ह्यात सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्त जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा नगरपरिषदेत सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कामगार आपल्या श्रमातून देशाच्या प्रगतीत योगदान देत असतात, त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली पाहिजे असं नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हण...

May 1, 2025 7:06 PM May 1, 2025 7:06 PM

views 24

महाराष्ट्र राज्यस्थापनेचा ६५वा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्राचा ६६ वा स्थापना दिन मुंबईत उत्साहानं साजरा केला जात आहे. राज्याच्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांना संबोधित केलं. राज्य सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमाव...

May 1, 2025 7:04 PM May 1, 2025 7:04 PM

views 6

राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या १०० दिवसांचं मूल्यमापन जाहीर

राज्यात शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं मूल्यमापन आज जाहीर झालं. कार्यक्षम संकेतस्थळ, कार्यालयीन तसंच तक्रार निवारण सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर अशा दहा मुद्द्यांवर  भारतीय गुणवत्ता परिषदेनं केलेल्या या मूल्यमापनानुसार ४८ विभागांपैकी १२ विभागांनी १०० टक्के उद्दिष्ट प्राप...

May 1, 2025 10:38 AM May 1, 2025 10:38 AM

views 20

वेव्हज परिषदेसाठी मुंबई सज्ज, प्रधानमंत्री करणार उद्घाटन

पहिल्यावहिल्या वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन परिषद २०२५ चं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश, माध्यमं, मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातली भारताची प्रतिभा अधोरेखित करणं, तरु...

April 30, 2025 7:25 PM April 30, 2025 7:25 PM

views 4

ISCE बोर्डाचा १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने आयएससीई इयत्ता १० वी आणि आयएससी इयत्ता १२ वी चे निकाल आज जाहीर केले. दोन लाख पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती तर ९९ हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.   दहावीत ९९ पुर्णांक ३७ टक्के गुणांसह मुलींनी...

April 30, 2025 8:53 PM April 30, 2025 8:53 PM

views 11

जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्वागत केलं आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला यामुळे मदत होईल, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दि...

April 30, 2025 7:36 PM April 30, 2025 7:36 PM

views 110

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झाले. फणसळकर यांनी ३० जून २०२२ रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.    फणसळकर यांच्या जागी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्...

April 30, 2025 7:28 PM April 30, 2025 7:28 PM

views 19

पीक वीमा योजनेत केलेला बदल चुकीचा असल्याची काँग्रेसची टीका

राज्य सरकारनं पीक वीमा योजनेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला बदल चुकीचा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं बातमीदारांशी बोलत होते.  हा बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. म्हणून तो रद्द करावा, आणि आतापर्यंत सुरु असलेली योजनाच पुन्हा ल...

April 30, 2025 4:32 PM April 30, 2025 4:32 PM

views 21

पहिली जागतिक WAVES summit India उद्यापासून मुंबईत

पहिली जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि दृक्‌श्राव्य उद्योगाच्या भविष्याला एक जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. या परिषदेत मनोरंजन क्षेत्रातली आघाडीची व्यक्तिमत्त्वं, विविध ...