प्रादेशिक बातम्या

November 30, 2025 7:09 PM November 30, 2025 7:09 PM

views 27

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यास येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केलं. यावेळी त्यांनी भित्तीपत्रकांचंही प्रकाशन केलं. राज्यपालांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याच...

November 30, 2025 7:03 PM November 30, 2025 7:03 PM

views 8

नांदेड जिल्ह्यातील्या कृष्णूर एमआयडीसीतल्या कामगारांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कामगार जखमी

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात असलेल्या कृष्णूर एमआयडीसीतल्या कामगारांवर काल बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कामगार जखमी झाला. त्यानंतर या बिबट्याच्या शोधात निघालेल्या वनविभागाच्या कामगारावरही बिबट्यानं हल्ला चढवला आहे. या परिसरात बिबट्यामुळे भितीचं वातावरण असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आ...

November 30, 2025 7:48 PM November 30, 2025 7:48 PM

views 135

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर

राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला २ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. तसंच प्रशासनाकडून २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे.   बीड जिल...

November 30, 2025 6:35 PM November 30, 2025 6:35 PM

views 7

मुंबईत बोरिवली इथं दिव्यांग बालकांसाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन

मुंबईच्या बोरिवली इथं आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते दिव्यांग बालकांसाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचं  उद्घाटन केलं.  या स्पर्धेमध्ये एकूण ४५० पेक्षा अधिक स्पर्धक, ९०० पालक आणि २०० स्वयंसेवकांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पीयूष गोयल यांनी ...

November 30, 2025 10:50 AM November 30, 2025 10:50 AM

views 38

बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं – डॉ. अजय कुमार

बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं असं आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांनी काल पुण्यात केलं.  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  आगामी शतकातील यु...

November 29, 2025 6:56 PM November 29, 2025 6:56 PM

views 58

निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग पोलिसांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यासह ३-४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी केलेल्या घुसखोरी प्रकरणी केनवडेकर यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला. यामागे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप राणे यांनी केला ...

November 29, 2025 6:27 PM November 29, 2025 6:27 PM

views 18

भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश

मुंबईत झालेल्या ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम’ कार्यक्रमात मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनीनं भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश केला आहे.  यामुळे इंस्टाग्राम, फेसबुकवरील क्रिएटर्स लवकरच त्यांच्या रील्सचे बंगाली, मराठी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ या भाषांमधे भाषांतर करू शकतील.  यासाठी एआय-आधारित ऑटोमॅ...

November 29, 2025 6:06 PM November 29, 2025 6:06 PM

views 10

मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी – वर्षा गायकवाड

मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली  आहे. त्या मुंबईत हवेच्या गुणवत्ता विषयावर काँग्रेसकडून आयोजित बैठकीत आज बोलत होत्या. दूषित हवेमुळे दरवर्षी मुंबईतले ५ हजार शंभर लोक आपले प्राण गमावतात असं गायकवाड या...

November 29, 2025 5:02 PM November 29, 2025 5:02 PM

views 13

दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांची गोंदिया पोलिसांकडे शरणागती

नक्षल संघटनेतला वरिष्ठ नेता अनंत उर्फ विनोद साय्यणा याच्यासह ११ नक्षली अतिरेक्यांनी काल गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.   यामुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. हे सर्वजण दरेकसा दलम या नक्षल गटाचे सदस्य होते असं गडचिरोली रेंज चे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं.  यावेळी पोलिसांन...

November 29, 2025 5:00 PM November 29, 2025 5:00 PM

views 151

ठाण्यात सेक्स रॅकेट उध्वस्त, पोलिसांची कारवाई

ठाणे पोलीसांनी केलेल्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उध्वस्त केले. या प्रकरणी थायलंडची नागरिक असलेल्या एका महिलेला अटक केली आहे, तर थायलंडच्याच नागरिक असलेल्या दोन महिलांची सुटका केली गेली अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.    अटक केलेली महिला वेश्याव्यवसायासाठी परदेशी नागरिकांच...