प्रादेशिक बातम्या

November 27, 2025 8:25 PM November 27, 2025 8:25 PM

views 67

आधार कार्डाच्या आधारे दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करा, तसंच याप्रकरणी पोलिस तक्रारी दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागानं जारी केलं.   अमरावती, सिल्लोड, अकोला, छ...

November 27, 2025 7:15 PM November 27, 2025 7:15 PM

views 21

मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडण्यामागे इथियोपियातल्या ज्वालामुखीचं कारण देता येणार नाही – Bombay HC

इथियोपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे मुंबई शहरात हवेची गुणवत्ता बिघडली, असं कारण देता येणार नाही, कारण त्याआधीपासूनच मुंबईत हवेचा दर्जा खालावलेला होता, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं आज नोंदवलं. मुंबईतल्या प्रदूषणाबद्दल २०२३पासूनच्या याचिकांवर सुनावणी घ्यायची विनंती मुख्य न्यायाधीश न्य...

November 27, 2025 8:25 PM November 27, 2025 8:25 PM

views 18

येत्या २ वर्षांत एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं सरकारचं ध्येय – मुख्यमंत्री

राज्यात येत्या २ वर्षांत एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज त्यांनी लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना...

November 27, 2025 8:25 PM November 27, 2025 8:25 PM

views 31

यंदा ३५० लाख मेट्रिक टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज

यंदाच्या ऊस गाळप हंगामात ३५० लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेचा आरंभीचा शिलकी साठा ५० लाख मेट्रिक टन असून देशांतर्गत साखरेचा खप २९० लाख मेट्रिक टन आहे. तर ३५ लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली जाईल. तरीसुद्धा ७५ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज राष्ट्...

November 27, 2025 7:09 PM November 27, 2025 7:09 PM

views 10

राज्यातल्या ५ जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून विकसित होणार

राज्यातल्या ५ जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार आहे. नागपूरमधल्या काटोल तालुक्यातली १०, अमरावतीमधल्या चांदूरबाजारमधली २३, हिंगोलीतल्या कळमनुरीतली ११, बारामतीमधली १० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातल्या २१ गावांचा यात समावेश आहे. यासं...

November 27, 2025 6:46 PM November 27, 2025 6:46 PM

views 29

धाराशिव नगरपरिषदेतल्या ३ प्रभागांची निवडणूक स्थगित

धाराशिव नगरपरिषदेतल्या तीन प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. धाराशिव नगरपरिषदेतल्या प्रभाग २ अ, ७ ब आणि १४ ब या प्रभागांमधल्या काही उमेदवारांच्या अर्जावरचे आक्षेप न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं या प्रभागांची निवडणूक पुढच्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचं धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंका...

November 27, 2025 6:45 PM November 27, 2025 6:45 PM

views 8

उद्धव-राज यांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतल्या जागावाटपाबाबत दोन्ही नेत्यांमधे चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मतदारयाद्यांमधल्या त्रुट...

November 27, 2025 6:44 PM November 27, 2025 6:44 PM

views 39

शेतीशी निगडीत कर्जवसुलीला स्थगिती!

महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढच्या एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सर्व बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुद...

November 27, 2025 3:49 PM November 27, 2025 3:49 PM

views 19

महायुतीमध्ये निधी देण्यावरून चढाओढ, शरद पवारांचा आरोप

महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला. बारामती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत, तर पैसे देऊन, निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात. ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हाच दृष्ट...

November 26, 2025 7:25 PM November 26, 2025 7:25 PM

views 15

मुंबईची हवा ‘खराब’ श्रेणीत

मुंबईत आज संध्याकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २२४ इतका नोंदवण्यात आला. हा आकडा अतिशय खराब या श्रेणीत मोडतो. इथियोपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक हे यामागचं कारण असू शकतं, शिवाय, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गुणवत्ता निर्देशांक सामान्यतः घसरलेला असतो.    गेल्या २४ तासात राज्यातल्या का...