प्रादेशिक बातम्या

June 20, 2025 7:10 PM June 20, 2025 7:10 PM

views 5

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यभरातही विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकं होणार आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे.   संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या प...

June 20, 2025 4:46 PM June 20, 2025 4:46 PM

views 12

राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी नद्याचं वाढलेलं पाणी प्रवाहात येत असल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पुण्याजवळ खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण ८४ टक्के भरल्याने १५ हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात ...

June 20, 2025 6:26 PM June 20, 2025 6:26 PM

views 8

हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही – शरद पवार

हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण, हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही, असं मत खासदार शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. राज्यात सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या वादावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, कोणाला स्वसंमतीनं हिंदी भाषा शिकायची असेल तर ...

June 20, 2025 3:37 PM June 20, 2025 3:37 PM

views 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचं अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव ...

June 20, 2025 10:24 AM June 20, 2025 10:24 AM

views 8

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन

टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आषाढी वारीसाठी काल आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. रात्री आठनंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री उशिरा मंदिर आणि शहर प्रदक्षिणा झाल...

June 21, 2025 10:17 AM June 21, 2025 10:17 AM

views 7

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात उत्साहात स्वागत

पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यनगरीत आगमन झालं. स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून, रांगोळ्या काढून दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत केलं. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवार्थ अन्नदान आणि इतर उपक्रम रा...

June 20, 2025 8:49 AM June 20, 2025 8:49 AM

views 12

राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस, आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसानं पुणे, नाशिक, लातूर, सातारा आणि रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठयामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून काल दुपारपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला असून पुणे महापालिकेनं नदीकाठच्या नागरिकांना सावधानते...

June 22, 2025 7:55 PM June 22, 2025 7:55 PM

views 12

CSMI विमानतळावर २४ किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी २४ किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा जप्त केला. थायलंडमधून तस्करी करून आणलेल्या या गांजाची बेकायदेशीर बाजारपेठेत अंदाजे २४ कोटी ६६ लाख  रुपये किंमत आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अमली पदार्थ...

June 19, 2025 7:18 PM June 19, 2025 7:18 PM

views 13

राज्यात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

यंदा साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त राज्यात विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. याच दिवशी योगिनी स्मार्त एकादशी आणि जागतिक संगीत दिन असल्यामुळे सांगली जिल्हा परिषदेने विश्व योग दर्शन यांच्या सहकार्यानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सांगलीतल्या छत्रपती शिवाजी महार...

June 19, 2025 7:14 PM June 19, 2025 7:14 PM

views 3

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापुरात  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल संध्याकाळी चित्तमपल्ली यांचं वार्धक्यानं निधन झालं. ते ९४ व्या वर्षांचे होते. आज अक्कलकोट मार्गावरच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस दलानं बंदुक...