प्रादेशिक बातम्या

July 1, 2025 8:42 PM July 1, 2025 8:42 PM

views 10

केंद्र सरकारकडून रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या सवलत योजनेची घोषणा

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रोजगाराशी संलग्न सवलत योजनेला मंजुरी दिली. या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल. १ कोटी ९२ लाख युवकांना याचा लाभ मिळेल, अशी आशा माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती देताना व्यक्त केली.  त्यांना कामावर ठेवणाऱ्या कंप...

July 1, 2025 3:59 PM July 1, 2025 3:59 PM

views 10

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ...

July 1, 2025 3:55 PM July 1, 2025 3:55 PM

views 12

कृषीमंत्र्यांच्या हस्ते महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण कार्यशाळेचे उद्धाटन

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कृषी विभागातर्फे महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण कार्यशाळेचा उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.   मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज, हवामान अनुकूल पी...

July 1, 2025 3:44 PM July 1, 2025 3:44 PM

views 4

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर इथे येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी जेवणाची मोफत व्यवस्था

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर इथे विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीनं ५ हजार २०० बसची व्यवस्था केली आहे. या बस घेऊन येणारे चालक, वाहक, इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चहा, नाश्ता आणि जेवणाची मोफत व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप स...

July 1, 2025 3:40 PM July 1, 2025 3:40 PM

views 16

संत तुकाराम महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन

संत तुकाराम महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं. जिल्हा प्रवेशानंतर माळशिरस तालुक्यात अकलूज इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण झाले. त्यानंतर अश्व रिंगण झालं. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलिसांच्या बँड पथकानेही पालखीचं स्वागत केलं.   तसेच यावेळी...

July 1, 2025 3:38 PM July 1, 2025 3:38 PM

views 12

     विधान परिषद : वाळू उपसा प्रकरणी चर्चा

विधान परिषदेत आज अवैध वाळू उपसा प्रकरण आणि संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. स्थानिक घरकुलांना वाळू उपलब्ध होत नसल्यानं वाळू तस्करी होत असल्याचा मुद्दा दादाराव केचे यांनी  उपस्थित केला.   मात्र राज्य सरकारच्या वाळू धोरणाअंतर्गत  स्थानिक तहसीलदारावर आणि तलाठी यांना घरकुला...

July 1, 2025 3:31 PM July 1, 2025 3:31 PM

views 2

उत्तर महाराष्ट्रातल्या दोन माजी आमदारांचा भाजपात प्रवेश

उत्तर महाराष्ट्रातल्या दोन माजी आमदारांनी आज मुंबईत भाजपात प्रवेश केला. धुळ्यातले काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी आज भाजपात प्रवेश केला. 

July 1, 2025 3:19 PM July 1, 2025 3:19 PM

views 20

मराठीच्या मुद्द्यावर शनिवारी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे सहभागी होणार

राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संयुक्तपणे विजयी मेळावा घेणार आहेत.   दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत समाज माध्यमावर याविषयी माहिती दिली आहे. मुंबईत वरळी इथं येत्या शनिवारी आयेजित या विजयी मेळाव्याला राज ठाक...

July 1, 2025 2:57 PM July 1, 2025 2:57 PM

views 4

विधानसभेत नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली. अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे, अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या...

June 30, 2025 3:30 PM June 30, 2025 3:30 PM

views 8

मराठीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं

विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधान भवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.    दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.