प्रादेशिक बातम्या

June 30, 2025 3:18 PM June 30, 2025 3:18 PM

views 3

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख ...

June 30, 2025 3:04 PM June 30, 2025 3:04 PM

views 2

आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात १५%सवलत

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात १५ टक्के सवलत मिळणार आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसंच ॲपवर आगाऊ आरक्षण करता येईल.   दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा काळ सोडता वर्षभर ही योजना स...

June 29, 2025 8:47 PM June 29, 2025 8:47 PM

views 8

मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं – नेते उद्धव ठाकरे

मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज वार्ताहर परिषदेत केलं. यासंदर्भात सरकारनं नेमलेल्या समितीला काहीही अर्थ नाही. कोणतीही समिती नेमली, तरी हिंदी...

June 29, 2025 8:45 PM June 29, 2025 8:45 PM

views 20

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती ...

June 29, 2025 7:52 PM June 29, 2025 7:52 PM

views 7

इंडिया रेटींग अँड रिसर्च या अर्थविषयक संस्थेच्या वतीनं २०२४ – २०२५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या पत मानांकनात नवी मुंबई महानगर पालिकेला डबल ए प्लस स्टेबल मानांकन जाहीर

इंडिया रेटींग अँड रिसर्च या अर्थविषयक संस्थेच्या वतीनं २०२४ - २०२५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या पत मानांकनात नवी मुंबई महानगर पालिकेला डबल ए प्लस स्टेबल मानांकन जाहीर झालं आहे. नवी मुंबई महानगर पालिकेनं सलग अकराव्या वर्षी हे मानांकन मिळवलं असून, अशी कामगिरी करणारी ती देशातली एकमेव महानगरपालिका ठरली आ...

June 29, 2025 7:49 PM June 29, 2025 7:49 PM

views 5

सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन

नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या विद्यापीठाची जागतिक स्तराव...

June 29, 2025 7:45 PM June 29, 2025 7:45 PM

views 11

पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी शासन निर्णयाची होळी

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ आज राज्यभरात विविध ठिकाणी विविध पक्षसंघटनांनी या शासन निर्णयाची होळी केली. त्रिभाषा सूत्र राज्यात लागू न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस, माकप, भाकप, वंचित ब...

June 29, 2025 7:36 PM June 29, 2025 7:36 PM

views 21

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा

मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा समाजबांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. आता आपल्याला रणभूमीत उतरून मैदान गाजवायचं अ...

June 29, 2025 7:30 PM June 29, 2025 7:30 PM

views 34

त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर प...

June 29, 2025 3:16 PM June 29, 2025 3:16 PM

views 4

भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदी सक्ती, शक्तिपीठ महामार्ग इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप / अधिवेशन पूर्व चहापान कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्णय

भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तिपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं आज केली. महाविकास ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.