प्रादेशिक बातम्या

January 9, 2026 3:28 PM

views 41

गोंदियात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातल्या खडकी गावात आज बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.  बिबट्यानं आज सकाळी मुलावर हल्ला करत त्याला घरातून फरपटत नेलं. गावकऱ्यांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केल्यावर मुलाला अर्ध्या वाटेत सोडून बिबट्या पसार झाला. मात्र, तोपर्यंत मुलाचा मृ...

January 9, 2026 8:53 PM

views 63

मुंबईच्या २६ भाजप कार्यकर्त्यांचं ६ वर्षांसाठी निलंबन

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे आदेश न मानणाऱ्या मुंबईच्या २६ भाजप कार्यकर्त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भात अधिकृत पत्रक जारी केलं आहे. वारंवार समज देऊनही महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य न केल्यामुळे या कार्यकर्त्यांवर ...

January 9, 2026 3:12 PM

views 26

परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि MIM सत्तेत एकत्र आल्याचा अंबादास दानवे यांचा दावा, शिवसेनेकडून खंडण

परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि MIM या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवसेनाच MIM ला हद्दपार करेल. त्यामुळं त्यांनी अधिक मा...

January 8, 2026 8:32 PM

views 28

अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला २५ हजार रुपये बक्षीस मिळणार

अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता २५ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सदर जखमी व्यक्तीला रोखरहित उपचार दिले जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

January 8, 2026 7:49 PM

views 40

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अपघातात २ जण ठार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड घाटात एक वाहन उलटून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर ४ जण जखमी झाले. अहिल्यानगरच्या शेवगावहून मध्यप्रदेशात उज्जैनला जाणारे ७ प्रवासी वाहनात होते. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं, परंतु दाखल करतानाच त्यांचा मृत्यू झाला.

January 8, 2026 6:57 PM

views 24

अंबरनाथनगरपरिषदेमधे भाजपात गेलेल्या नगरसेवकांविरुद्ध काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार

भाजपामधे प्रवेश केलेल्या अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करणं किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं हे असंवैधान...

January 8, 2026 4:50 PM

views 11

प्रगती या व्यासपीठामुळं देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती

प्रगती या व्यासपीठामुळं देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती आल्याचं प्रतिपादन माजी कॅबिनेट सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. प्रगतीच्या अंतर्गत आढावा घेतला जात असलेल्या काही प्रकल्पांची निवड खुद्द प्रधानमंत्री...

January 8, 2026 4:36 PM

views 29

येत्या १५ तारखेला वसई-विरारमधे मतदारांना हॉटेल बिलावर १५ टक्के सवलत

येत्या १५ तारखेला होणाऱ्या वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हॉटेल बिलांमध्ये तसंच रिक्षा भाडं आणि बस तिकीटांवर विशेष सवलत देण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात पालिकेने एक अधिकृत पत्रक जारी केलं आहे.    त्यामुळे आता वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना हॉटेल...

January 8, 2026 3:55 PM

views 21

छत्रपती संभाजीनगर इथं प्रचाररॅली दरम्यान दंगल भडकावल्याप्रकरणी ६० जणांविरोधात गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर इथं काल एमआयएम पक्षाच्या प्रचाररॅली दरम्यान, बेकायदेशीर जमाव करणं, दंगल भडकावल्याप्रकरणी ६० जणांविरोधात  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   यातल्या १३ जणांची ओळख पटली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांची पायी मिरवणूक सुरू असताना एमआयएम आणि प्...

January 8, 2026 3:45 PM

views 24

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरा बदलण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. तसंच, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणाही त्यांनी केली.   एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.