प्रादेशिक बातम्या

January 11, 2026 5:55 PM

views 23

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा तृतीय क्रमांक

बंगळुरू इथं झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं तृतीय क्रमांक पटकावला आहे.  मुंबई विद्यापीठाच्या महिला संघानं अखिल भारतीय स्तरावर प्रथमच पदक पटकावलं. या कामगिरीच्या जोरावर संघाची खेळों इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.

January 11, 2026 5:46 PM

views 23

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे- विजय वडेट्टीवर

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी आज अकोल्यात केली. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यावरूनही त्यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. एमआयएमचे नेते...

January 11, 2026 3:35 PM

views 13

तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं मरीन ड्राईव्ह इथं आयोजन

येत्या १४ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ट्राय सर्व्हिस व्हेटरन्स डे निमित्त तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं आयोजन आज मुंबईत मरीन ड्राईव्ह इथे करण्यात आलं होतं. या संचलनात तिन्ही सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी, नौदलाचे कॅडेट्स, एनसीसी कॅडेट्स यांनीही सहभाग घेतला होता. भारतीय...

January 10, 2026 8:48 PM

views 31

UPSC च्या सर्व परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याची पडताळणी होणार

UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या   निवड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्यक्ष चेहरा पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. २०२५ दरम्यान झालेल्या एन डी ए च्या,  नेव्हल अकॅडेमि च्या आणि सी डी एस च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचीही आयोगानं चेहरा पडताळणी केली होती. या...

January 10, 2026 8:12 PM

views 23

बारावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून हॉल तिकिट डाऊनलोड करता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून    बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकिटे उपलब्ध करून दिली जातील. या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असणे बंधनकारक असल्याची माहिती माहिती राज्य मंडळाचे सचिव...

January 10, 2026 7:20 PM

views 59

यूट्युबर संग्राम पाटील यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं

लंडनस्थित डॉक्टर आणि लोकप्रिय यूट्युबर संग्राम पाटील यांनी आज सकाळी पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं. त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत नोटीस बजावून प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं.  भाजप पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात पोलिसांनी ही ...

January 10, 2026 3:05 PM

views 150

तुषार आपटेचा ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा राजीनामा

भारतीय जनता पक्षानं बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला सह-आरोपी तुषार आपटे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतल्या 'स्वीकृत' नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. काल त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केली होती.    भाजपाचा हा निर्णय दुर्...

January 10, 2026 3:11 PM

views 64

पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या जाहीरनाम्यात पुण्यातल्या प्रमुख नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितल...

January 10, 2026 3:11 PM

views 65

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. १०० नवे काँक्रीट रस्ते, ३०० खाटांचं पालिका रुग्णालय, प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना इत्यादी आश्वासनं भाजपानं या जाहीरनाम्यातून दिली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि स्थानिक आमदार नरेंद्र मे...

January 9, 2026 3:39 PM

views 63

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी AIसह डिजिटल माध्यमांचा वापर

महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवार तसंच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटलं उपकरणं, तंत्रज्ञानासह विविध माध्यमांचा उपयोग करत आहेत. पदयात्रा, रॅली आणि सभा या पारंपरिक पद्धतींसह निवडणूक प्रचारात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश झाला आहे. ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.